26.4 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeKhedटंचाईग्रस्त गावांची बैठक घ्या - आमदार शेखर निकम

टंचाईग्रस्त गावांची बैठक घ्या – आमदार शेखर निकम

टंचाई निवारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ.

गावोगावी पाणी योजना झाल्यातरी पाणी टंचाई संपत नाही. पुढील पंधरा वीस दिवसात तालुक्यातील नदी नाले, पऱ्यातील पाण्याचे स्त्रोत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार टंचाई जाणवणाऱ्या गावांची स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे. टंचाई निवारणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीमधील बैठकीत केले. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात टंचाई आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे- पाटील, पाणी पुरवठा उपअभियंता अविनाश जाधव, कृषी अधिकारी बाबासाहेब पाटील, तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पाणी टंचाईवर भाष्य करताना आमदार निकम म्हणाले, पाणी योजनांवर कोट्यवधीचा खर्च झाला तरी टंचाई जाणवते. जलजीवन मिशनमधून पाणी योजनांचा आराखडा करताना अनेक गावात त्रुटी जाणवल्या. २५ लाखापर्यंत स्थानिक स्तरावर मान्यता असल्याने त्यालाच ग्रामपंचायतींनी प्राधान्य दिले. प्रत्यक्षात योजनांची कामे सुरू झाल्यानंतर काही वाड्यांना पाणी पुरवठा होत नसल्याचे जाणवले. त्यातून सुधारित आराखडे करून त्यास मंजूरी घेतली. पाणी योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. एकावेळी संपूर्ण गावाचा विचार करून योजना व्हावी.

तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी ग्रामपंचायतींनी दक्ष राहावे. टंचाई निवारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. यानिमित्ताने गावात प्रत्येक कुटुंबाना नळ जोडणी करून पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. हर घर जल या मोहिमेत निर्व्हळ भिले, कालुस्ते खुर्द, मांडकी खुर्द, कुशिवडे, पिंपळी खुर्द, नागावे, खोपड, खांडोत्री, ताम्हणमळा, गुळवणे, हडकणी, गांग्रई, कोंडफणसवणे, रागवळगाव, धामेली, आदी गावच्या सरपंच व ग्रामसेवकांचा आमदार शेखर निकम व तहसीलदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular