33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriपेट्रोलपंपावर इंधनाचा राखीव साठा ठेवा - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पेट्रोलपंपावर इंधनाचा राखीव साठा ठेवा – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हयात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने जिल्हाधिकाऱ्यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पेट्रोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील ७५ पेट्रोलपंपावर बफर स्टॉक (राखीव साठा) ठेवणेबाबत लेखी सूचना दिल्या. किती तुटवडा याची माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मिरज डेपोमधून एकही पेट्रोल-डिझेलचा टँकर भरून दिलेला नाही. त्यानंतर मिरजमधील तिन्ही डेपोमधून टँकर भरून देण्यांत आले.

मात्र दुसऱ्या दिवशीही टंचाई सदृश्य परिस्थितीमुळे इंधनासाठी वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर गर्दी होती. टँकरचालकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम जाणवू लागला असून जिल्हयात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने बैठक घेतली. जिल्ह्यात जवळपास ७५ पेट्रोलपंप असून त्यांची दररोजची पेट्रोल व डिझेलची मागणी किती आहे, सध्या किती गाड्या उपलब्ध होत आहेत. याबाबतची माहिती तत्काळ घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

गॅस गोडावूनमध्ये पुरेसा साठा आहे का, याची माहिती सादर करावी अशी सूचना गॅस एजन्सीधारकांना जिल्हाधिकारी यांनी दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच उदय लोध यांनी आज मिरज येथून जिल्ह्यासाठीचे पेट्रोल व डिझेल टैंकर रवाना झाल्याचे सांगितले. जनतेमध्ये कोणताही गैरसमज होवून कोणत्याही गोंधळाची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग तसेच पेट्रोल पंपचालक यांच्यात सहकार्य व समन्वय ठेवावा अशी सूचना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular