25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRajapurसौंदळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सौंदळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे.

तालुक्यातील सौंदळ येथे बिबट्याने दीपक चव्हाण यांच्यावर गुरुवारी रात्री अचानक हल्ला केला. यामध्ये दीपक चव्हाण बचावले; मात्र त्यांच्या उजव्या हाताला इजा झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करून त्याला जखमी करण्याची तालुक्यातील ही दुसरी घटना असून, सौंदळ येथील घटनेने तालुक्यासह पाचल भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. चव्हाण सौंदळ पाटीलवाडीकडून ओणी-सौंदळ-पाचल रस्त्याला असलेल्या शेताकडे दुचाकीवरून येत होते. या परिसरातील शेतशिवार आणि काळोखामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्त्यामध्ये एका वळणावर दुचाकीवरील चव्हाण यांच्यावर हल्ला केला.

बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. आवाजाने त्या परिसरातील लोकांनी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर, त्या ठिकाणी आलेले उदय हळदणकर आणि त्यांचे मित्र, रायपाटणचे ग्रामस्थ प्रकाश पाठाडे यांनी जखमी चव्हाण यांना तत्काळ रायपाटण ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी सदानंद घाडगे आणि सहकारी कुंभार, विजय म्हादये, रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कमलाकर तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची चौकशी केली.

ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे. जंगल परिसरासह विबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होते. महिनाभरापूर्वी तळगाव पंचक्रोशीमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याला पिंजऱ्यांमध्ये जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या भागामध्ये कॅमेरेही बसवले होते. गतवर्षीं शहरामध्ये एका महिला अधिकाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला.

RELATED ARTICLES

Most Popular