25.7 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeKhedखेडमधील बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी अद्याप बंद, उपोषणाचा इशारा

खेडमधील बॅडमिंटन हॉल खेळाडूंसाठी अद्याप बंद, उपोषणाचा इशारा

२६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देणारे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

शहरातील शासकीय तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल १ जानेवारीपासून खेळाडूंसाठी बंद करण्यात आला आहे. अनेकवेळा तहसीलदार, तालुका क्रीडाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी यांना कळवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने येथील नियमित बॅडमिंटन खेळणाऱ्या युवकांनी २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देणारे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे.  उपोषणकर्ते खेळाडू श्रीकांत कदम, अमित गरूड, कपिल कोळेकर, सौरभ नागणे, विपिन पाणापल्ली, जयेश शिर्के, परिमल पाटणे आदी गेली पाच वर्षे या क्रीडा संकुलात नियमित बॅडमिंटन खेळतात.

क्रीडा संकुलाच्या चालकांनी ठरवलेले शुल्क दरवर्षी पूर्ण भरून या खेळाचा आनंद घेतात; मात्र काही लोकांनी शुल्क भरलेले नाही किंवा त्यांच्याकडून संबंधित क्रीडा संकुल चालकांनी शुल्क वसूल केलेली नाही. हे कारण देऊन क्रीडा संकूल होतकरू खेळाडूंसाठी बंद होत असेल तर हे शासकीय क्रीडा धोरणाचे अपयश आहे, असे स्पष्ट मत उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शासनाने कोट्यवधीचा निधी खर्च करून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंसाठी उभारलेल्या क्रीडा संकुलाचे ५ डिसेंबर २०१५ ला उद्घाटन करण्यात आले होते. क्रीडा सुविधा संकुलामार्फत होतकरू खेळाडूंना शासनाकडून सुविधा देण्यात आल्या असल्या तरी क्रीडा संकुलाची निगराणी राखण्याचे काम तालुकास्तरीय अधिकारी करू शकत नाहीत, ही राज्याच्या क्रीडा धोरणाची शोकांतिका आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

Most Popular