29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeRatnagiriकोकण रेल्वे लवकरच कंटेनर वाहतूक सुरु करणार…

कोकण रेल्वे लवकरच कंटेनर वाहतूक सुरु करणार…

खेड रेल्वे स्थानकातून सुरू होणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी वेगाने पाऊले उचलली जात आहेत. 

कोकण रेल्वेने माल वाहतूकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून खेड रेल्वे स्थानकातून कंटेनर वाहतूक लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या वाहतूकीसंदर्भात आवश्यक त्या सुविधांची उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड स्थानकातून लवकरात लवकर कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर खेड येथील उद्योजक, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कॉनकॉर, कस्टम विभाग आणि महाप्रित यांचा एक व्यापारी मेळावा सोमवारी मुंबईत बीकेसी येथे पार पडला. खेडमधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीबाबत येथे सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. खेड रेल्वे स्थानकातून सुरू होणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी वेगाने पाऊले उचलली जात आहेत.

या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांना या निमित्ताने एकच छत्रा खाली आणण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आला. कॉनकॉर चे चेअरमन संजय स्वरूप यांनी कॉनकॉर ने रत्नागिरी आणि खेडमध्ये व्यापार वृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि खेड मधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीचे फायदे सांगितले. कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार यांनी व्यापार वृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे उभारल्या जात असलेल्या गोदाम, शीतगृह अशा विविध सुविधांची माहिती दिली. संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी विविध योजनांतर्गत उभारल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा बाबत माहिती दिली. कॉनकॉर च्या कमल जैन यांनी खेड मध्ये उद्योजकांना कॉनकॉर कडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.

जेएनपीटी सीमाशुल्क उपायुक्त रामदास काळे यांनी व्यापाराशी संबंधित सीमाशुल्क विभागाचे नियम आणि बदलत्या काळातील व्यापार यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या व्यापारी मेळाव्यात खेड चिपळूण येथून आलेल्या उद्योजकांनी अनेक शंका प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यांचे शंका निरसन कोकण रेल्वे, कॉनकॉर आणि सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. मुंबईत सोमवारी संपन्न झालेल्या व्यापारी मेळाव्यात विविध विभाग आणि उद्योजक एकत्र आल्याने त कोकण रेल्वे च्या मार्गावर व्यापार वृद्धीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नात महत्त्वाचे पाऊल पडले आहे. खेड मधून फेब्रुवारी च्या मध्यापासून कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular