26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriबस झालं, आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही..! सामंत समर्थकांकडून इशारा

बस झालं, आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही..! सामंत समर्थकांकडून इशारा

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाने हा विषय प्रतिष्ठेचा करून ताणून धरला आहे.

बस झालं आता… मंदिरातील प्रसाद नाही आम्ही, सगळ्यांमध्ये सारखा वाटून जायला. आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही. ना कम, ना जादा… रामकृष्ण हरी… अशी सोशल मीडियावर किरण सामंत समर्थकांकडून व्हायरल झालेली पोस्ट हा इशारा समजायची का? अशी चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील संबंध अधिक ताणल्याची ही चिन्हे आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु उमेदवार कोण हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा महायुतीचा तिढा काही सुटण्याचे नाव घेईना.

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाने हा विषय प्रतिष्ठेचा करून ताणून धरला आहे. मात्र, यामध्ये कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा आहे, हे आता दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविण्याची गरज आहे. एकदा भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा पुढे येते. तर काही वेळातच शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांचे नाव पुढे येते. परंतु महायुती म्हणून गेली आठ दिवस या विषयाची फक्त चर्चाच सुरू आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची उत्सुकता पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांमध्ये आहे. कोकणपट्ट्यात भाजपला एकही जागा नसल्यामुळे पक्ष वाढीसाठी हे हानिकारक आहे. त्यामुळे भाजप ठाम आहे; तर ही पारंपरिक जागा असल्याने शिवसेनाही या जागेवर ठाम आहे.

यावर तोडगा निघावा यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर आता किरण सामंत देखील मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. परंतु कधी पारडे राणेंकडे झुकते, तर कधी सामंतांकडे; परंतु निर्णय काही होत नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर, आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही. ना कम, ना जादा… अशी पोस्ट किरण सामंत यांच्या समर्थकांनी फेसबुकवर व्हायरल केली आहे. याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सहनशीलतेचा अंत – कमळ चिन्हावरच ही जागा लढली गेली पाहिजे, असा भाजपचा आग्रह आहे. परंतु सामंत धनुष्यबाणावरच निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने आता शिवसेना पदाधिकाऱ्यांची सहनशीलता संपल्याचे बोलले जाते. भाजपने ज्या पद्धतीने हा विषय ताणून धरला आहे, त्यावरून मित्रपक्षाने हा इशारा दिला आहे असा तर्क लढवला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular