21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळुणात बांगलादेशी पकडले सलग २ दिवसात केली ४ जणांवर कारवाई

चिपळुणात बांगलादेशी पकडले सलग २ दिवसात केली ४ जणांवर कारवाई

बांगलादेशहन भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करत होते.

चिपळुणात आणखी दोन बांगलादेशी पकडले सलग २ दिवसात केली ४ जणांवर कारवाई दिवसांत चार जणांवर कारवाई करण्यात आंली. या बांगलादेशींना काही बांधकाम व्यावसायिकांनी आश्रय दिल्याचे समोर आले आहे. महंमद हसन अली (३६) व असाद कामरु जवान सिरीना (२४, दोघेही सध्या रा. मार्कडी परकार चाळीसमोर, मूळ रा. पो. कुशखली, तहसील सातखिरा, जि. खुलना, ठाणा, सातसिरा, राज्य ढाका, बांगलादेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद दहशतवाद बांगलादेशींना बांधकाम क्षेत्राचा आश्रय? नव्याने अटक केलेले दोघेजण भारतात अवैधरित्या प्रवेश करून मार्कडी, परकार चाळसमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत राहत होते.

हे दोघेही १२ डिसेंबर २०२३ ते १७ एप्रिल २०२४ रोजी या कालावधीत अवैधरित्या याठिकाणी वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झालें आहे. यापूर्वीही काही जण बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचे व तेथेच एखादी खोली भाड्याने घेऊन राहत असल्याचे उघड झाले आहे. विरोधी शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश दगडू गुरव यांनी दिली आहे. या दोघांविरुद्ध भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परिः ३(१) (अ), परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ अन्वये कारवाई केली आहे. यापूर्वीही चिपळुणातून आठ ते दहा बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे.

बांगलादेशहन भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय वास्तव्य करत होते. मूळचे बांगलादेशी असलेल्या या व्यक्तींकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधारकार्ड, निवडणूक मतदार असलेले ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळली आहेत. त्यामुळे नागरीकत्व नसतानाही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कोण कोणते व्यवहार केले, असे अनेक प्रश्न याआधी उपस्थित करण्यात आले. परंतु, त्याचा तपास थंडावला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular