27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeSindhudurgविनायक राऊतांचे डिपॉझिट "जप्त करणार : नारायण राणे

विनायक राऊतांचे डिपॉझिट “जप्त करणार : नारायण राणे

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येणारा काळ उज्वल असेल असे मत राणेंनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे डिपॉझिट जप्त करून मी प्रचंड मतांनी निवडून येणार असा दावा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी केला. सावंतवाडी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या सोबत ना. दिपक केसरकर, राजन तेली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार नाखयण राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राणे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येणारा काळ उज्वल असेल असे मत राणेंनी व्यक्त केले.

तर विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. त्यांना याचा विसर पडला आहे. राऊत यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात मंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना केला. ते म्हणाले, दिल्लीच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंनी. नेतृत्व केलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी शपथ घ्यावी अशी जनतेची इच्छा आहे. भरघोस मतांनी त्यांना निवडून देत मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पाठवणार आहे. येथील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात येत आहे. सिंधुदुर्गतील लोकांना रोजगारासाठी गोव्याला जाव लागू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. २०० कोटींचा प्रकल्प इथे होत आहे.

उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या कोकणच्या विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे. विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. ते अपघातानं खासदार झाले आहेत. आता त्यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादीचे सुरेश गवस, युवराज लखम राजे भोंसले आदी उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular