फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट रोड येथील एका व्यक्तीची १७ लाख ९८ हजार ३७७ रूपयांची. आर्थिक ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दि. १२ ते १६ एप्रिल दरम्यान घडला. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात महिलेविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सारा परकार असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद लियाकत महंमद सालेह परकार (४८, रा. गोवळकोट रोड) यांनी. चिपळूण पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लियाकत परकार व सारा परकार यांची फेसबुकच्या म ाध्यमातून ओळख झाली होती.
सारा परकार या महिलेने लियाकत परकार यांना परदेशात शेअर मार्केटमध्ये पैसे मिळविण्याचे आमिष दाखवून मोबाईल व्हॉट्सअपव्दारे संपर्क केला. त्यांना लिंक पाठवून त्यामध्ये त्यांची माहिती भरण्यास सांगितली. काही दिवसांनी लियाकत यांनी त्या अकाऊंटव्दारे ट्रेडींग केले असता त्यामध्ये युएसडीटी जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामधील युएसडीटी रक्कम मिळणेसाठी त्या महिलेने परकार यांच्याकडे ट्रेडींग चार्जेस पे व टॅक्स भरण्यास सांगितले. त्यानुसार लियाकत परकार यांनी कोकण मर्कन्टाईल बँक चिपळूण येथील खात्यातून पहिले आरटीजीएसव्दारे ९ लाख ५८ हजार १४१.३२ रूपये तर पुन्हा त्याच बँक खात्यातून आरटीजीएसव्दारे ८ लाख ४० हजार २३६ रूपये अशी एकूण १७ लाख ९८ हजार ३७७.३२ रूपये त्यांनी त्या महिलेच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यावर पाठवू दिले.
ट्रेडींग करून अकाऊंटला जमा झालेली युएसडीटीमधील रक्कम भारतीय चलनात कन्व्हर्ड करण्यासाठी सारा परकार हिने लियाकत परकार यांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास चिपळूण पोलिसांमार्फत सुरू आहे.