28.1 C
Ratnagiri
Wednesday, February 25, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeSindhudurgउद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत जाहीर सभा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर प्रचार सभा शुक्रवार ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होणार आहे. या प्रचार सभेची जय्यत तयारी सुरू असून इंडिया-महाविकासचे आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि जिल्हावासीयांनी उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

आ. वैभव नाईक यांनी सभा स्थळाची पाहणी केली व नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, संकेत नाईक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular