31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriसंगमेश्वर रोड स्थानकातून विक्रमी उत्पन्न

संगमेश्वर रोड स्थानकातून विक्रमी उत्पन्न

२०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ६ लाख प्रवाशांनी प्रवास केला.

संगमेश्वर स्थानकात नऊ रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी पूर्ण करणार का, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकाने कोकण रेल्वेला मागील आर्थिक वर्षात विक्रमी उत्पन्न दिले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून लांब पल्ल्यांच्या अतिरिक्त गाड्याना थांबा, स्थानकावरील दोन फलाटांना जोडणारा पादचारी पूल, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण आदी मागण्यांचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा, अशी मागणी केली आहे. संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ६ लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून कोकण रेल्वेला ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ एवढे भरघोस उत्पन्न मिळाले.

कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे. मध्यंतरी निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या ग्रुपने पत्राद्वारे कोकण रेल्वे प्रशासनाकडे ९ गाड्यांना थांबा मिळण्याची मागणी केली होती. उत्पन्न मिळत असल्याने या थांब्यांचा प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे. संगमेश्वर हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे, याचा विचार कोकण रेल्वेने करून आम्हाला थांबे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वरसाठी एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस, जामनगर, जबलपूर, गांधीधाम, कोचुवेल्ली, वेरावल, जनशताब्दी, तेजस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याची मागणी केली आहे.

जून महिन्यात नवनिर्वाचित खासदारांचा कार्यकाळ सुरू होईल आणि आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. आगामी काळात संगमेश्वरसारख्या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर लक्ष देऊन प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि रत्नागिरीदरम्यान सकाळी ७.५० किंवा ११.३० या वेळेत नवीन गाडी सुरू झाली तर ती फायदेशीर ठरू शकते.

चाकरमान्यांची ये-जा वाढतेय – संगमेश्वर तालुक्यातील हजारो ग्रामस्थ नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्याला आहेत. हे सर्वजण भातशेती म्हणजेच पावसाळ्यात, गणेशोत्सवाला, दिवाळीत किंवा भातकापणीदरम्यान तसेच शिमगोत्सवाला गावी येतात. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्यामुळे खासगी वाहनांपेक्षा रेल्वेला प्राधान्य ते देतात. चाकरमान्यांची गावाकडील ये-जा वाढत असल्यामुळे रेल्वेचे प्रवासी वाढत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular