22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriरत्नागिरीत प्रशासकीय इमारतीचे काम जोरात

रत्नागिरीत प्रशासकीय इमारतीचे काम जोरात

सुमारे ५२ शासकीय कार्यालय इमारतीच्या एका छताखाली येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्ह्यातील सर्वांत मोठी ९ मजली प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १०० कोटीचा हा प्रकल्प आहे. कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एका छताखाली सर्व शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाची एकूण ५२ कार्यालये इमारतीमध्ये असणार आहेत. या उद्देशाने ही इमारत उभारण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या चार महिन्यांपासून या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या इमारतीच्या मागे दुसरी नवीन दोन इमारती उभारण्यात आली.

यामध्ये सध्या जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा विभाग, पालिका प्रशासन, चिटणीस शाखा यांच्यासह अन्य कार्यालय आहेत. दुसऱ्या इमारतीमध्ये तहसील कार्यालयासह, एमटीडीसी, वजनमाप, माहिती कार्यालय आहे; परंतु अजूनही अनेक शासकीय कार्यालये इतरत्र आणि भाड्याच्या जागेत आहेत. सर्वसामान्य नागरिक प्रशासकीय कामासाठी आले तर त्यांना इतरत्र फिरत राहावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. याचा विचार करून सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला यासाठी शासनाकडून १०० कोटीचा निधी मंजूर झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणारी ही इमारत ९ मजली आहे. यामध्ये तळमजल्यावर सुमारे ३५० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली चार महिने या प्रशासकीय इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे ५२ शासकीय कार्यालय इमारतीच्या एका छताखाली येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular