26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriकोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार

कोकण रेल्वेचा वेग १५ जूनपासून मंदावणार

४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गाच्या सुरक्षितेसाठी पावसाळी हंगामातील गाड्यांच्या वेळा आणि वेगावर मर्यादा येणार आहे. यंदा कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ४२ गाडांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत. नवीन वेळापत्रक १५ जून ते २० ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. मुंबईतील स्थानकांतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल नसला तरी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकात येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या एक ते दोन तास लवकर येणार आहेत. या वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेगात ताशी ५० किलोमीटर असा बदल होणार आहे. यंदा पहिल्याच पावसात विलवडे स्थानकादरम्यान दरड कोसळली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पावसात कोकण रेल्वे सुरक्षित राहिली. गाड्यांचा वेगही सुसाट होता; मात्र, येत्या काळात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दक्षता घेत यंदा वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ४२ गाड्यांच्या वेळा १२८ दिवसांसाठी सुधारित केल्या आहेत.

नवे वेळापत्रक – एर्नाकुलम जंक्शन ते पुणे (२२१४९) एर्नाकुलमहून पहाटे ५:१५ वाजता ऐवजी मध्यरात्री २:१५ वाजता निघेल. एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन (२२६५५) – एर्नाकुलमहून ५:१५ ऐवजी ०२:१५ वाजता निघेल. मडगाव ते मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस (१०१०७) मडगावहून पहाटे चारऐवजी ४:४० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम उत्तर ते योगनगरी ऋषिकेश (२२६५९) तिरुवनंतपुरम उत्तर येथून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम (१२२१७) उत्तर चंदीगडला जाणारी गाडी तिरुवनंतपुरम (उत्तर) कडून सकाळी ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता निघेल. तिरुवनंतपुरम (१२४८३) उत्तर अमृतसरला जाणारी ट्रेन तिरुवनंतपुरम उत्तरहून ९:१० ऐवजी पहाटे ४:५० वाजता निघेल. तिरुनेलवेली हापा एक्स्प्रेस (१९५७७) तिरुनेलवेलीहून सकाळी ८ ऐवजी पहाटे ५:०५ वाजता सुटेल तिरुनेलवेली ते गांधीधाम (२०९२३) तिरुनेलवेलीहून सकाळी ८ ऐवजी पहाटे ५:०५ वाजता निघेल. रत्नागिरी ते दिवा (५०१०४) रत्नागिरीहून ५:३५ ऐवजी पहाटे ५:४० वाजता निघेल. तिरुवनंतपुरम उत्तर ते एलटीटी (१२२०२) तिरुवनंतपुरम येथून सकाळी ९:१० ऐवजी सकाळी ७:४५ वाजता सुटेल.

मडगाव ते हजरत निजामुद्दीन (२२४१३) मडगावहून सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता निघेल. मडगाव ते मुंबई सीएसएमटी (१०१०४) – मडगावहून ९:१५ ऐवजी ८:३० वाजता सुटेल. सावंतवाडी रोड ते दिवा (१०१०६) सावंतवाडीहून ८.२५ ऐवजी ८.४० वाजता निघेल. तिरुवनंतपुरम उत्तर ते इंदूर (२०९३१) तिरुवनंतपुरम येथून सकाळी ११:१५ ऐवजी ९:१० वाजता निघेल. तिरुवनंतपुरमहून पोरबंदरला (२०९०९) तिरुवनंतपुरमहून सकाळी ११:१५ ऐवजी ९:१० वाजता निघेल. मडगाव ते हापा (२२९०७) -मडगावहून १०:४० ऐवजी १० वाजता निघेल. मडगाव ते चंदीगड (१२४४९) -मडगावहून ११:२० ऐवजी १० वाजता निघेल एर्नाकुलम जंक्शन ते हजरत निजामुद्दीन (१२६१७) एर्नाकुलमहून १३:२५ ऐवजी सकाळी १०:३० वाजता निघेल. मडगाव ते एलटीटी मुंबई (१११००) – मडगावहून १२.३० ऐवजी सकाळी ११.३० वाजता निघेल. जनशताब्दी मडगाव ते मुंबई सीएसएमटी (१२०५२) मडगावहून दुपारी ३:०५ वाजता ऐवजी १२ वाजता सुटेल. मडगाव ते मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२३०) मडगावहून १४.४० ऐवजी १२.२० वाजता निघेल.

मडगाव ते एलटीटी मुंबई (१२६२०) – मडगावहून दुपारी २:२० ऐवजी दुपारी १२:४५ वाजता निघेल. मडगाव ते मुंबई सीएसएमटी (२२१२०) – मडगावहून १५:३५ ऐवजी १२:५० वाजता सुटेल. करमाळी ते एलटीटी मुंबई (२२११६) – करमाळीहून दुपारी २.१० ऐवजी १.४० वाजता सुटेल. एर्नाकुलम जंक्शन ते मडगाव साप्ताहिक एसएफ एक्स्प्रेस (१०२१६) – एर्नाकुलम जंक्शनहून सकाळी १०.४० ऐवजी दुपारी १३.२५ वाजता सुटेल. कोइम्बतूर ते हिसार (२२४७६) -कोइम्बतूरहून दुपारी २.५५ ऐवजी १.३० वाजता निघेल. तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन (१२४३१) – तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून संध्याकाळी ७.१५ ऐवजी दुपारी २.४० वाजता निघेल. मडगाव ते मंगळुरू सेंट्रल पॅसेंजर (५६६१६) – मंगळुरूहून दुपारी २:१० ऐवजी दुपारी २.१५ वाजता सुटेल. मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी मुंबई (१२१३४) मंगळुरू जंक्शनहून दुपारी दोन ऐवजी सायंकाळी ४.३५ वाजता सुटेल.

मडगाव ते मंगळुरू सेंट्रल-वंदे भारत एक्सप्रेस (२०६४५) मडगावहून संध्याकाळी ६.१० ऐवजी ५.३५ वाजता निघेल. सावंतवाडी रोड ते दादर तुतारी एक्स्प्रेस (११००४) – सावंतवाडी रोड येथून रात्री आठ ऐवजी संध्याकाळी ५.५५ ला सुटेल. मडगाव ते मुंबई सीएसएमटी (२०११२) मडगावहून सायंकाळी सातऐवजी सहाला सुटेल. सावंतवाडी रोड ते मडगाव (५०१०७) सावंतवाडी रोड येथून १८.३५ ऐवजी १८.५० वाजता सुटेल. एर्नाकुलम ते अजमेर (१२९७७) एर्नाकुलमहून २०.२५ ऐवजी १८.५० वाजता निघेल. मडगाव ते एर्नाकुलम (१०२१५) एर्नाकुलमहून १९.३० ऐवजी २१ वाजता सुटेल. तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन (२२६५३) – तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून शनिवारी रात्री १२.५० ऐवजी शुक्रवारी रात्री १० ला निघेल.

RELATED ARTICLES

Most Popular