23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeChiplunमहामार्गावर सीएनजी पंपांची कमतरता, चाकरमान्यांची वाढती मागणी

महामार्गावर सीएनजी पंपांची कमतरता, चाकरमान्यांची वाढती मागणी

रायगडपासून रत्नागिरीपर्यंत केवळ ११ सीएनजी पंप आहेत.

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी केली जातात; मात्र, सीएनजी पंपांची कमतरता आहे. त्यात मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकदा सीएनजी संपले आहे असेच फलक पंपावर लावलेले दिसत असतात. मुंबई-पुण्यातील चाकरमानी सीएनजीवर चालणारी वाहने घेऊन गावी आल्यामुळे सीएनजीच्या मागणीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्याचबरोबर कोकणात सुट्यांसाठी चाकरमानी देखील येत आहेत.

या सर्व वाहनचालकांना मुंबई- गोवा महामार्गावर सीएनजीअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी पंपांवर कधीकधी तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यातच सीएनजी संपल्यास रांगेत उभ्या असलेल्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रायगडपासून रत्नागिरीपर्यंत केवळ ११ सीएनजी पंप आहेत. त्या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी अर्घा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पंपावर सीएनजी उपलब्ध झाल्यानंतर पंपचालक सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून त्याची माहिती स्थानिक वाहनचालकांना देतात.

RELATED ARTICLES

Most Popular