26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeKhedरेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती

या प्रकल्पाअंतर्गत ८ खाड्यांवर पूल बांधण्यात येणार आहेत.

संपुर्ण कोकण किनारपट्टीच्या कायापालटाचा राजमार्ग ठरणाऱ्या रेवस ४४७ किमी अंतराच्या सागरी महामार्गाच्या कामाला गती प्राप्त होत असून, या महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील उप्प्यामधील रेवस कारंजा आणि आगरदांडा दीघी या दोन महत्वपूर्ण पुलांच्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) देण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यानचा प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र एमएसआरडीसीकडून रेवस ते रेड्डी सागरी किनारा महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीने रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दोघी अशा दोन खाडीवरील पुलांसाठी तांत्रिक निविदा मागविल्या होत्या. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, दोन्ही खाडीपुलांसाठी एकूण पाच निविदा सादर झाल्या आहेत. रेवस ते कांरजा पूलासाठी दोन तर आगरदांडा ते दोघी पूलासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. लवकरव आर्थिक निविदा देखील खुल्या करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले. आहे. एमएसआर‌डीसीच्या मध्यिमातून रेवस ते रेडी हा ४४७ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे.

मुंबई आणि कोकणाला जोडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाअंतर्गत ८ खाड्यांवर पूल बांधण्यात येणार आहेत. या ८ खाडीपुलांपैकी रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दोघी अशा दोन खाडीपुलांच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. आगरदांडा ते दीबी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन, टी. अँड टी. इन्फ्रा तसेच विजय एम. मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत. आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करून निविदा अंतिम केल्या जाणार असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले. निविदा अंतिम केल्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण करुन या दोन्ही खाडीपुलाच्या कामास सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular