31.8 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळूण रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

चिपळूण रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

चिपळूण रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे.

येथील रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट होत आहे. येथील सुशोभीकरणाने वेग घेतला असून, येत्या काही महिन्यांत चिपळूण रेल्वे स्थानकाला नवा साज मिळणार आहे. सध्या होणारी गैरसोय दूर होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबई-गोवा मार्गावरील वालोपे रस्ता ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवाशांमधून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी केली जात होती.

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाहने पार्किंग शेडची व्यवस्था नव्हती. तसेच प्रवाशांची गर्दी झाल्यास अथवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पाऊस, उन्हात उभे राहायचे म्हटले तर कोणतीही सोयी सुविधा नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत होते. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूणसह खेड रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार चिपळूण रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. सुशोभीकरणांतर्गत परिसराचे पहिल्या टप्प्यात काँक्रिटीकरण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात शेड पार्किंग, इलेक्ट्रिशियन, स्टोन पिचिंग आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular