25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriसाखरपा येथे तरूणावर हल्ला केलेल्या बिबट्याचा मृत्यू

साखरपा येथे तरूणावर हल्ला केलेल्या बिबट्याचा मृत्यू

तरुणाला दुर्गंधी आल्याने त्याने पाहिले असता बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला.

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे तरूणावर हल्ला करणाऱ्या जखमी अवस्थेतील बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला आहे. तरूणावर हल्ला केलेल्या ठिकाणापासून शेजारील गुरांच्या गोठ्यात हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या वाड्यातील सामान काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुर्गंधी आल्याने त्याने पाहिले असता बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. यानंतर वन विभागाला संपर्क करण्यात आला. तालुका वनअधिकारी तौफिक मुला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोचले. त्यांनी प्राथमिक पाहणी करून मृत बिबट्याला बाहेर काढले.

शुक्रवारी ज्या ठिकाणी तरु णावर हल्ला झाला होता, त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्यात बिबट्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपासून जखमी असलेला हा बिबट्या आसरा शोधत असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जखमी असल्याने त्याने जास्त अंतर पार न केल्याची शक्यता त्यांनी सांगितली. यानंतर त्या बिबट्याला देवरुख येथे नेवून शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या मृत बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

वनविभागासोबत, पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित झाले होते. मृत झालेला हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे ५ वर्ष इतके त्याचे वय असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वनविभागाच्या विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला, पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षक मुजावर मॅडम यांच्यासमवेत वनरक्षक सुरज तेली, आकाश कुडूकर, सहयोग कराडे, अरुण माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular