25 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeSportsसामना जिंका उपांत्यफेरी गाठा, बांगलादेशविरुद्ध भारताचे आज लक्ष्य

सामना जिंका उपांत्यफेरी गाठा, बांगलादेशविरुद्ध भारताचे आज लक्ष्य

बांगलादेशचा संघ सुपर आठ फेरीत सलग दुसऱ्या दिवशी दुसरा सामना खेळणार आहे.

तीन दिवसांत सलग दुसरा सामना जिंकून २०-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची थेट उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी भारताला उद्या मिळणार आहे; पण त्यासाठी धोकादायक बांगलादेशचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. बांगलादेशचा संघ सुपर आठ फेरीत सलग दुसऱ्या दिवशी दुसरा सामना खेळणार आहे. भारत-बांगलादेश सामन्याला नेहमीच वेगळी किनार असते. १७ वर्षांपूर्वी याच वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशने भारताचा पराभव केला होता आणि त्यामुळे पुढे जाऊन भारतीयांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते.

तेव्हापासून बांगलादेशचा संघात भारताविरुद्ध खेळताना नेहमीच खुमखुमी असते. भारतीय संघाला पराभूत करू शकतो, असे त्यांना नेहमीच वाटत असते. परिणामी रोहित सेनेला सावध राहावे लागणार आहे. अर्थातच बांगलादेश संघात काही अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांच्या खेळात गुणवत्ता डोकावते. अनुभवी शकीब बरोबर महमुदुल्ला आणि मेहदी हसन या अष्टपैलू खेळाडूंची साथ आहे. मुस्तफिजूरसारखा टी२० क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला गोलंदाज बांगलादेश संघात आहे त्याला भारतीय संघाला या बलस्थानांची कल्पना आहे.

बांगलादेश समोरच्या भारतीय संघ डावाच्या सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करायचा प्रयत्न करेल, असे समजले आहे. पहिल्या सामन्यातील विजयानंतरही सलामीच्या अपयशाचा मुद्दा चर्चेला आलाच होता. बांगलादेशसमोर रोहित आणि विराट थोडा धोका पत्करून मोठे फटके मारायचा खेळ करतील, अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे. फलंदाजांना १८० चा धावफलक उभारता आला, तर भारतीय गोलंदाजांच्यात असलेली क्षमता संघाला विजयाकडे नेऊ शकते.

RELATED ARTICLES

Most Popular