29.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriदेवळे घाट वाहतुकीस बनला धोकादायक

देवळे घाट वाहतुकीस बनला धोकादायक

पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातील माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल झाला आहे.

मिऱ्या – नागपूर महामार्गाच्या कामामुळे आंबाघाटा प्रमाणेच देवळे घाटही वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेली कामे, रस्त्यासाठीचे खोदकाम, ढासळलेली माती यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. घाट परिसर असल्यामुळे वाहनचालकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गाचे देवळेफाट्यापासून दाभोळे गावापर्यंत असलेला घाट हा देवळेघाट म्हणून ओळखला जातो. साडेतीन किमीचा हा घाट आहे; पण आता महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हा घाट धोकादायक झाला आहे.

ठिकठिकाणी घाटात काम सुरू असल्यामुळे वाहने चालवायची कशी, हा प्रश्न चालकांना पडत आहे. देवळेफाटाजवळ जुन्या रस्त्याच्या कडेला डोंगरात जेसीबीने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे डोंगरातील माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल झाला आहे. त्यावरून दुचाकी घसरून चालक जखमी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. घाटातील अवघ्या अर्धा किमीच्या एकाच पॅचचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दाभोळे गावाच्या बाहेरून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी काजळी नदीवर लांजा रस्त्यावरून पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातही रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

घाटात टाक्याचा माळ ते यू आकारातील वळण या भागातील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. एका बाजूला डोंगर असल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी या भागात साचते. याच ठिकाणी सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामामुळे डोंगरातून आलेले पाणी थेट रस्त्यावरच सोडण्यात आले आहे. त्यामुळे खालील रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वाहने चालवणे हे दिव्य ठरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular