26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeRatnagiriकोकण रेल्वेलाही पावसाचा फटका

कोकण रेल्वेलाही पावसाचा फटका

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम झाला.

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सलग दोन दिवस काही गाड्या उशिराने धावत आहेत. करमाळी ते वेर्णादरम्यान पहाटेला ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने दिल्लीकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस सुमारे सहा तास तर नेत्रावती एक्स्प्रेस पाच तास उशिराने धावत होती. कोकणासह गोव्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेमार्गावर होत आहे. कोकण रेल्वेमार्गावर करमाळी ते वेर्णा सेक्शनमध्ये पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युतवाहिनीवर पावसामुळे झाड कोसळून पडल्यामुळे सोमवारीही कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत होती.

सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मार्गावरील अडथळा दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली. मागील दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस सुरू आहे. या घटनेमुळे अप् दिशेने धावणारी नेत्रावती तसेच एर्नाकुलम येथून दिल्लीला जाणारी मंगला एक्स्प्रेस सुमारे पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम झाला. रविवारी रत्नागिरीहून दिव्याला जाणारी सकाळी ५.३० वा. सुटणारी पॅसेंजर गाडी पेणपर्यंतच होती. ही गाडी सकाळी नागोठणे येथे ११.३० वा. पोहोचली. तेथून पेणला जाईपर्यंत दुपारचे १.४५ वाजले.

RELATED ARTICLES

Most Popular