29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यात धान्य वितरण तांत्रिक दोषामुळे ठप्प

जिल्ह्यात धान्य वितरण तांत्रिक दोषामुळे ठप्प

ऑफलाईन धान्य वाटप करण्यास परवानगी नाही.

जिल्ह्यात ऑफलाईन धान्य वाटपास केंद्र शासनाने परवानगी नाकारली आहे. राज्यात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे जुलै महिन्यातील धान्य वितरण थांबले आहे. तरी जिल्हा पुरवठा विभागाच्या पाठपुराव्यामुळे ५० टक्के धान्य वाटप झाले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून हा तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ऑफलाईन धान्य वाटप करण्यास परवानगी नाही.

ऑफलाईन धान्य वाटप केल्यास केंद्र शासनाकडून मार्जिनच्या रकमेची व इतर खर्चाची प्रतिपूर्ती मिळत नाही तसेच केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, यापुढे कॅरी फॉरवर्ड सुविधेसाठी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता केंद्र शासनास पत्र पाठवण्यात आले आहे व धान्य वाटपास मुदतवाढ देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पुरवठा विभागाने केले आहे.

प्राधान्यातील लाभार्थी १ लाख ४२ हजार – प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी १ लाख ४२ हजार ४२ आहेत. त्यांना ८९२.५२० मेट्रिक टन गहू उचलण्यात आला. त्यापैकी ५४२.५९३ टन वितरण झाले असून, ८४९.९२७ टन गव्हाचे वाटप शिल्लक आहे. ३६४५.८६ मेट्रिक टन तांदूळ उचलला असून २१६२.३९४ टन वितरित झाले असून, १४८३.४६६ टन तांदूळ शिल्लक आहे. तांत्रिक दोष लवकर दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे; परंतु जिल्ह्यात या अडचणीमुळे धान्य वाटप थांबले आहे.

अंत्योदय कार्डधारक ३९ हजार २५५ – जिल्ह्यात एकूण ३९ हजार २५५ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये ३५५.०२० मेट्रिक टन गहू उचलला असून २२०.९४७ मेट्रिक टन वितरित झाला असून, १३४.०७३ मेट्रिक टन शिल्लक आहे, तर ८९४.९८९ तांदूळ उचलला असून, ५५२.५६१ मेट्रिक टन वितरित झाला आहे. ३४२.४२८ टन तांदूळ शिल्लक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular