30 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeChiplunतात्काळ फाशी द्या या मागणीसाठी चिपळुणात उद्या जनआंदोलन

तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी चिपळुणात उद्या जनआंदोलन

सर्वच थरातून त्याला फाशी दिलीच पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण येथील युवती कु. यशश्री हीची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी व्हावी, या मागणीसाठी तसेच दुष्प्रवृत्ती विरोधात चिपळूणात गुरुवार, १ ऑगस्ट रोजी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. उरणमध्ये यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची २५ जुलै रोजी निघृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २७ जुलै रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर, आता आरोपी दाऊद शेख याला आज कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याने मुन्ह्याची कबुली दिली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

सध्या प्रकरण चर्चेत आहे सर्वच थरातून त्याला फाशी दिलीच पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त ‘लव्ह जिहाद विरोधी कायद्या’ची भेट द्यावी. अशी मागणी चिपळूणकरांनी केली आहे. गुरुवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. नगरपालिकेसमोर खेडेकर क्रीडा संकुल येथे सर्व हिंदू बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ७२७६४७९७३०, ९८२२१२२५७६, ७५८८९०२४५१या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, यावरून यशश्रीच्या आईने अंत्यत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे. हे प्रकरण पॅस्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे. माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली तडफडून गेल्या आहेत, त्यांनाही न्याय द्या. म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल. पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्याला द्या आणि फाशी द्या, असे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular