24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriरत्नागिरीत ९६ एकरवर 'इको टुरिझम' उभारणार - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीत ९६ एकरवर ‘इको टुरिझम’ उभारणार – पालकमंत्री उदय सामंत

आरे-वारे येथील ९६ एकर जमिनीवर इको टुरिझम विकसित केले जाणार आहे.

पथदर्शी प्रकल्प म्हणून माध्यमिक शाळांतील मुलींसाठी प्रत्येक तालुक्यात ५ याप्रमाणे “फुलराणी कक्ष” उभारण्यात येणार आहेत. राज्यातील हा पायलट प्रोजेक्ट आहे तसेच अभियांत्रिकी महाविद्यायलाच्या परिसरात सुसज्ज १० कोटीचे सभामंडप (ऑडिटोरियम) उभे करण्यात येणार आहे. आरे-वारे येथील ९६ एकर जमिनीवर इको टुरिझम विकसित केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, खैर लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत रोपे दिली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना वनखात्याला दिल्या आहेत.

सद्यःस्थितीत असणारी १ लाख रोपे शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी त्यांची नोंदणी करून घ्यावी आणि जिल्ह्यात खैर लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अधिकारी आणि रत्नागिरीकर यांच्यासाठी रत्नागिरी क्लब उभारण्याची सूचनाही दिली आहे. त्याचे सदस्यत्वाची नोंदणी लवकरच होणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १० कोटींचे सुसज्ज ऑडिटोरियम उभे करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन केले आहे तसेच प्रातांधिकाऱ्यांनी रत्नागिरी क्लब निर्मिती करावी. त्यामधील अद्ययावत जिमसाठी ५० लाख रुपये देण्याची सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना केली.

शासकीय पत्रकार भवन – एमआयडीसीच्या माध्यमातून ३ गुंठे जागा देऊन त्या ठिकाणी शासकीय पत्रकार भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी चालू वर्षी १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. एमआयडीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये याबाबतचा निर्णय झाला. नाममात्र भाडेतत्त्वावर ही जागा दिली जाणार आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा. भवन उभारले जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular