25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedभोस्ते घाटात अज्ञाताचा सांगाडा प्रकरणाला वेगळे वळण?

भोस्ते घाटात अज्ञाताचा सांगाडा प्रकरणाला वेगळे वळण?

फॉरेन्सिक टीम कडून अनेक या संदर्भात तपासण्या सुरू आहेत.

खेड येथील भोस्ते घाटात अज्ञाताचा सांगाडा सापडल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. सावंतवाडीच्या तरुणाला पडलेले स्वप्न… मदतीची याचना… खरोखरच मृतदेह सापडणे, या सर्वच गोष्टी अनाकलनीय असल्याने पोलिसांनी आता ज्या व्यक्तीने स्वप्नं पडल्याचा दावा केला होता त्याचीही चौकशी सुरु केली आहे. तज्ज्ञांकडून त्या तरुणाच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फॉरेन्सिक टीम कडून अनेक या संदर्भात तपासण्या सुरू आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत.

मात्र आता खेड पोलिसांना माहिती दिलेल्या या तरुणाचा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती मिळाला आहे. सावंतवाडीतील आजगाव येथील योगेश आर्या या तरुणांने इंस्टाग्रामवर अकाउंट उघडून करून हा व्हिडिओ टाकला होता. या सगळ्या प्रकरणाची पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक गायकवाड यांच्या सूचनेनुसार खेड़ पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथक पाठवण्यात आले आहेत. सावंतवाडी येथील तरुण योगेश आर्या याने खेड पोलिसांना स्वप्न पडल्याचा दावा केला होता. त्याची चौकशी गुरुवारी करण्यात आली आहे.

त्याच बरोबर तज्ज्ञांकडून त्या तरुणाच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जाणार आहे. यातून या संपूर्ण प्रकरणाच्या अधिक खोलात जाता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular