27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriएकनाथ शिंदेंना महायुतीत आणण्यात मोठी भूमिका उदय सामंताचीः रामदास आठवले

एकनाथ शिंदेंना महायुतीत आणण्यात मोठी भूमिका उदय सामंताचीः रामदास आठवले

विधानसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत यांना मोठ्या मताधिक्‌याने विजयी करा.

एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये आणण्यासाठी उदय सामंत यांची मोठी भूमिका होती. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केला, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे आंबा, काजुसह मासेमारी हे प्रमुख व्यवसाय चालतात. परंतु येथील तरूणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे उद्योग येणे आवश्यक आहे. देश, राज्याच्या तुलनेत गेल्या ३० ते ३५ वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अॅट्रॉसिटीच्या केवळ ३०५ केसेस दाखल झाल्या आहेत. यावरून रत्नागिरीत सामाजिक न्यायाचा सलोखा उत्तम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायं राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

तर ‘वेळ आली तर देईन माझी जान, कोणालाही बदलू देणार नाही देशाचे संविधान’ या कवितेने ना. आठवले यांनी भाषणाला सुरूवात केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने ना.रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ना. आठवले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, जिल्हाध्यक्ष तथा सभाध्यक्ष प्रितम रूके, महाराष्ट्र सरचिटणीस गौतमभाऊ सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई महासचिव विवेक पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मचंडे, विठोबा पवार, ‘वि. ल. मोहिते, जिल्हा सरचिटणीस तथा मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक आदेश मर्चडे, सचिन मोहिते, अनिल जाधव, तु. गं. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्याच्या वतीने भव्य पुष्प-हार घालून आकर्षक सन्मानचिन्हाने ना. आठवले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आपण चालवत आहोत. महाराष्ट्रासहीत देशातील ३५ हून अधिक राज्यांमध्ये आरपीआय सक्रीय आहे. पक्ष छोटा असला तरी माणसं जमतात. मी सत्तेत सहभागी असलो तरी स्थानिक पातळीवर सत्त्-पेचा वाटा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे हे एकमेव आपले ध्येय्य आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तिसऱ्यांदा आपल्याला मंत्रिपदाची संधी दिल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.

आरपीआयमार्फत मी एकमेव राज्यसभेचा खासदार आहे. माझ्या पक्षाला सभागृहात बोलायला कमी वेळ मिळतो म्हणून मी शायरीच्या मध्यिमातून कमी शब्दांत माझ्या भावना सभागृहात मांडत असतो. काहींना ते पटत नाही. परंतु मला पटते ते मी करतो, असे ना. आठवलें यांनी सांगितले. आरपीआयच्या माध्यमातून दिल्ली दरबारी बाबासाहेबांचे विचार मांडण्याचे काम आपण करत असतो व मरेपर्यंत मी आरपीआयचे नाव पुसू देणार नाही. अनेकजण पक्ष बदलतात, पक्षांची नावे बदलतात. परंतु रामदास आठवले अखेरपर्यंत आरपीआयमध्येच दिसेल, असे यांनी स्पष्ट केले.

देशासह राज्यातील अनेक म हत्त्वाचे मार्ग पूर्ण झाले. परंतु मुंबईपासून ‘गोव्याला जोडणारा महामार्ग अद्याप अपूर्ण आहे. याची कारणे काय आहेत, या खोलात मी जाणार नाही. परंतु हा महामार्ग पूर्ण होणे पर्यटनबाढीसाठ आवश्यक आहे. याबाबत आपण रस् वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच भेट घेऊन कमीत कमी वेळेत हा मा पूर्ण करण्याची मागणी करणार आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून मागास समाजाचे प्रश्न सोडविले जात आहे. त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या स्मारकासाठी भरीव निधी दिला आहे. आपण महायुतीत आहोत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत यांना मोठ्या मताधिक्‌याने विजयी करा असे आवाहन ना. आठवले यांनी आरूप- ीआय कार्यकर्त्यांना केले.

RELATED ARTICLES

Most Popular