23.5 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeMaharashtraमहापालिकेमध्ये सेनेची सत्ता असून, भूमिपुत्रांवर अन्यायच कसा होतो !

महापालिकेमध्ये सेनेची सत्ता असून, भूमिपुत्रांवर अन्यायच कसा होतो !

भारतामध्ये अनेक जाती धर्माचे वेगवेगळे सण एकत्रितरित्या गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. श्रावण महिन्यात हिंदू धर्माचे विविध सण-उत्सव असतात. त्यापैकीच एक म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते. यंदा २२ ऑगस्ट २०२१  रोजी नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला एक वेगळंच महत्व असत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव दर्याला श्रीफळ अर्पण करतात आणि विधिवत पूजा करतात आणि पुढील वर्षापर्यंत सांभाळ करण्याचे गाऱ्हाणे घालतात.

कोळी आणि मच्छीमारी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा म्हणजे मासेमारीला पुन्हा प्रारंभ सुरु करण्याचा दिवस. पण आज त्यांच्यावर एक वेगळेच दु:खाचे संकट ओढवले होते. मुंबईतील दादर मासळी बाजार आणि क्रॉफरड मार्केट येथिल मच्छी बाजारावर कुर्हाड चालवण्यात आली आहे.

मुंबईचे खरे रहिवासी म्हणजे कोळी बांधव. पण बाहेरून आलेल्या लोकांनीच मुंबई बळकावली असल्याचे कोळी मच्छिमार बांधवांकडून सांगण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी आश्वासन दिले आहे कि, मुंबईमधून तुम्हाला कोणीही बाहेर काढणार नाही, तुमच्या हक्काचे तुम्हाला सर्व मिळणार.

सदर परिसरातील मच्छीमार्केटमुळे आजूबाजूच्या परिसरातील हायफाय लोकांना येणाऱ्या माशांच्या वासाच्या त्रासामुळे हि कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. कोळी बांधवांच्या चरितार्थाचे एकमेव साधन असलेला मच्छिमारी व्यवसायावर अशाप्रकारे कुर्हाड चालविण्यात आल्याने कोळी बांधवांनी देखील शासनाला इशारा दिला आहे कि, जो पर्यंत समुद्राचे पाणी संपणार नाही, तोपर्यंत कोणीही कोळी बांधव मुंबई बाहेर जाणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये सेनेची सत्ता असून, भूमिपुत्रांवर अन्यायच कसा होतो? या अतिक्रमणाविरोधात २५ ऑगस्ट रोजी कोळी आणि मच्छिमारी बांधवांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular