29.1 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeKhedउद्धव ठाकरेंनीच भाजपसाठी चर्चेची दारे बंद केली, रामदासभाई कदम

उद्धव ठाकरेंनीच भाजपसाठी चर्चेची दारे बंद केली, रामदासभाई कदम

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कोकणात विधानसभा निवडणुकांचे रणांगण तापल आहे अशातच शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी पाच वर्षांपूर्वी तुटलेल्या शिवसेना-भाजप युती बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न सांगत जर का उद्धवजींनी फोन उचलले असते तर उद्धव ठाकरे तेव्हाच अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले असते असाही गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसबरोबरच जायचे होते असाही गंभीर आरोप शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीरपणे केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खेड येथे आयोजित आदिवासी समाजाच्या मेळाव्यानंतर रामदास कदम यांनी पत्रकारांजवळ संवाद साधताना तुटलेल्या युतीबाबतचा हा गोप्यस्फोट केला आहे.

कदम पुढे म्हणाले की, मी आजवर कधीही बोललो नव्हतो मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तब्बल वीस ते पंचवीस वेळा फोन केले होते. मात्र एकही फोन न घेता भाजपासाठी मातोश्रीची चर्चेची दार उद्धव ठाकरे यांनीच बंद केली. होती असा आरोपवजा दावा रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केला आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस बरोबर जायचं होतं म्हणूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोन कॉल स्वीकारले नाहीत आणि या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार मी आहे असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular