22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्हा परिषदेत बदल्या करणारे रॅकेट सक्रीय ? आदेश काढत अनेकांवर अन्याय केल्याची चर्चा

जिल्हा परिषदेत बदल्या करणारे रॅकेट सक्रीय ? आदेश काढत अनेकांवर अन्याय केल्याची चर्चा

जिल्हा परिषदेत काही कर्मचारी एकेका विभागात १०-१५ वर्ष ठाण मांडून बसले आहेत.

जिल्हा परिषदेत बदल्या करून देणारे एक रॅकेट पुन्हा एकदा सक्रीय झाले असून आचारसंहितेत या बदल्या अडकू नयेत म्हणून कोणतेही ‘खाडे’ न करता आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी घाईघाईत पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्याप्रमाणात देवाणघेवाण झाली असल्याची चिर्चा खुलेआम सुरु असून काहींना व्हॉट्स अॅपद्वारे पदोन्नतीचे आदेश पाठवून याबाबत कोठेही चर्चा करू नका असे सांगण्यात आल्याने जिल्हा परिषदेत त्याबाबतची जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत ४ दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याचा प्रताप उघडकीस आला असून त्याची चर्चा सुरु आहे. आता तर नवे रॅकेट पुढे आले आहे. बदल्या कोणत्याही असोत त्यामध्ये ३ बडे अधिकारी आणि त्यांचे काही चमचे हे लगेच सक्रीय होतात असे जि.प.वर्तुळात खुलेआमपणे बोलले जाते. मग ती पदोन्नती असो अथवा बदली असो अशावेळी कोणतेही निकष त्यांना लागू होत नाहीत.

बढती मिळाली – निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्याला अडचणी निर्माण होतील, यासाठी घाईघाईने पदोन्नत्यांची यादी तयार करण्यात आली. जवळजवळ ६ वरिष्ठ सहाय्यक लिपिकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती जाहीर झाली. पदोन्नती जाहीर झाली तरी त्याचे आदेश काढायचे होते. त्यासाठी आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधी घाईघाईने तसे आदेश काढण्यात आले अशीही चर्चा जि.प. वर्तुळात सुरु आहे.

निवृत्तीपुर्वी नियुक्ती ? – खरंतर एखाद्याला पदोन्नती देताना त्याठिकाणचे पद रिक्त आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारी महिला काही दिवसांनी निवृत्त होणार आहे. मात्र त्या निवृत्त होण्यापुर्वीच वरिष्ठ सहाय्यक लिपीक यांना त्यांच्या जागी पदोन्नती जाहीर करण्यात आली. कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याठिकाणी नियुक्ती देणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आचारसंहिता अडचणीची ठरू नये म्हणून घाईघाईत मागच्या तारखेनेआदेश काढून त्यांना पुन्हा पदोन्नतीचे, आदेश व्हॉट्सअॅपने काढण्यात आले व याबाबत कुठलीही चर्चा करू नका, असे मेसेज देखील टाकल्याचे चर्चीले जात आहे.

घाईघाईत आदेश – या साऱ्या प्रकारात गेले ३ वर्ष एका विधवा महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप होतो आहे. ५३ वर्ष वयाचा शासनादेश असताना त्या शासन आदेशानुसार या महिलेला बदली मिळू शकते. मात्र या महिलेच्या अर्जाकडे सातत्याने दुर्लक्ष करून मलिदा मिळेल अशा काही अर्जाचा विचार करून घाईघाईत त्यांना पदोन्नती देण्यात आली. काहींचे ‘खाडे’ झाले ते खाडे वेगळ्या पद्धतीने भरून काढण्यात आले, अशी चर्चा आता जिल्हा परिषदेत जोरदार सुरू आहे.

अनेक वर्षांपासूनचे रॅकेट – जिल्हा परिषदेत काही कर्मचारी एकेका विभागात १०-१५ वर्ष ठाण मांडून बसले आहेत. कारण मोठी सेटींग असल्याने या कर्मचाऱ्यांना बदलण्यासाठी कोणी पुढे येत नाही. मग तो शिक्षण विभाग असो किंवा साम ान्य प्रशासन विभाग असो सगळीकडे सेटींग करणारे रॅकेट सक्रीय आहे आणि हे अधिकारी कोण? कर्मचारी कोण? याची माहिती वरिष्ठांना आहे. मलिदा खाणारे बोके वर्षानुवर्षे ठाण मांडून बसल्याने सर्वसामान्या कर्मचाऱ्यांना मात्र न्यायापासून वंचित रहावे लागत आहे असे खुलेआमपणे जि.प. वर्तुळात चर्चीले जात असून संबंधितांनी याची योग्यती दखल घ्यावी आणि उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular