26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriभाकरी परतण्यासाठी निवडणूक लढवणार - बाळ माने

भाकरी परतण्यासाठी निवडणूक लढवणार – बाळ माने

जनतेने कौल दिला तर मी निवडणूक लढवणार आहे.

सध्याचे रत्नागिरीचे आमदार नको असल्याचे जनमत विविध सव्र्व्हेच्या माध्यमातून स्पष्ट झाले. भाकरी परतायची आहे. मी सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून जनतेने आपणास निवडणूक लढवण्याचा कौल दिला तर मी निवडणूक लढवणार. मतदारांना गृहित धरू नये. याबाबत पुढील चार दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याबाबत कोणताही खुलासा त्यांनी केला नाही. त्यामुळे त्याबाबत सस्पेन्स कायम आहे. हॉटेल विवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, २ लाख ८८ हजार मतदार रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात आहेत. या सर्व जनतेला मी आवाहन करतोय की तुम्हाला आमदार कसा हवा आहे? मी निवडणूक लढवावी का याबाबत प्रतिक्रिया पाठवा.

जनतेने कौल दिला तर मी निवडणूक लढवणार आहे. रत्नागिरी वाचवायची आहे, अशी आमची टॅगलाईन आहे. रत्नागिरीकरांना समर्थ पर्याय हवा आहे. त्यांनी सांगितले की, लोकसभेपासून या मतदारसंघात बदलाची अपेक्षा लोकांना आहे. मागील तीन दिवसांत रत्नागिरी विधानसभेत बूथ कमिटीच्या २७ बैठका घेतल्या. त्यात लोकांनी मला निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. सगळ्या समाज माध्यमातून कोणती भूमिका घ्यावी हे सुचवण्यासाठी मतदारांकडून प्रतिक्रियांची, अभिप्रायांची मी येत्या ४ दिवसांत अपेक्षा करत आहे. रत्नागिरीकरांना बदल हवाय तर मतदारांनी कळवावे. मतदारांनी सुचवल्यास आपण या निवडणुकीतून माघार घेऊ.

मैत्री दोन्ही बाजूंनी असते – मंत्री उदय सामंत यांनी बाळासाहेबांना न्याय मिळाला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. ते तुमचे महायुतीतील मित्र आहेत, या प्रश्नाबाबत बाळ माने म्हणाले की, आम्ही खास मित्र नाही. मैत्री दोन्ही बाजूने असते. तशी मैत्री असती तर खासदार राणे यांना लाखभर मते मिळायला हवी होती.

RELATED ARTICLES

Most Popular