23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedगुहागर किनाऱ्यावर सायंकाळी जाण्यास मज्जाव

गुहागर किनाऱ्यावर सायंकाळी जाण्यास मज्जाव

पर्यटकांसह स्थानिक स्टॉलधारक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवाळी सुट्टयांमुळे पर्यटकांनी कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेल्या गुहागरात मोठी गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहेत; मात्र, गुहागर चौपाटीवर किनाऱ्यावरील पोलिस कर्मचारी आणि बंदर विभागाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यटकांना समुद्रात आंघोळ करण्यास व सायंकाळी सात वाजल्यानंतर बसू दिले जात नसल्याने पर्यटकांसह स्थानिक स्टॉलधारक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गुहागरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला असून, या हंगामाची सुरवात दिवाळीतील सलग पडलेल्या सुट्ट्यांमुळे झाली आहे. निसर्गसौंदर्याबरोबरच लांबलचक स्वच्छ, सुंदर समुद्रचौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटनस्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात.

गुहागरमधील अनेक देवस्थाने ही मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी राहणाऱ्यांची कुलदैवत असल्याने कामानिमित्त स्थलांतरित झालेली मंडळी गुहागरात येत असतात तर दुसरीकडे इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलेले पर्यटक हे वर्षानुवर्षे पर्यटनासाठी गुहागरची निवड करत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या या ठिकाणी लक्षणीय असते. दिवाळी सुट्टीमुळे गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, खाद्यपदार्थांची स्टॉलवर पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसते. परचुरी खाडीमध्ये सत्यवान दर्देकर यांनी कोकणातील पहिलीच हाऊसबोट सुरू केली असून, या सेवेला पर्यटक पसंती देत आहेत शिवाय मगर सफरदेखील सर्वांना आकर्षणाचे झाले आहे. चित्रपट व टीव्ही मालिकामुळे गुहागरचे सुंदर रूप सर्वदूर पोहोचल्याने पर्यटकांचा ओढा गुहागरच्या दिशेने येताना दिसत आहे.

गुहागर शहरात चांगल्या दर्जाचा पर्यटक समुद्र चौपाटी, सुरूबनाचा आणि लांबलचक समुद्राचा आनंद लुटत असतो. नगरपंचायतीकडून सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत; परंतु, गेल्या काही दिवसांपासून बंदर विभागाकडून ठेवण्यात असलेले सुरक्षारक्षक व पोलिस कर्मचारी समुद्रात आंघोळ करणाऱ्या पर्यटकांना सायंकाळी बाहेर काढतात. त्यामुळे काही पर्यटक तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर जाणे पसंत करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular