25.3 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeKhedकोकण रेल्वे मार्गावर धावणार तीन ख्रिसमस विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर धावणार तीन ख्रिसमस विशेष गाड्या

गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे

हिवाळी पर्यटन हंगाम तसेच खिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विशेष गाड्या पुढीलप्रमाणे असतील १) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – कुरमळी – मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज): गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी करमळी विशेष (दररोज) मुंबई सीएसएमटी येथून ००.२० वाजता दररोज २०/१२/२०२४ ते ०५/०१/२०२५ दरम्यान सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता ती पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज) करमळी येथून १४.१५ वाजता दररोज २०/१२/२०२४ ते ०५/०१/२०२५ दरम्यान सुटेल व मुंबई सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता ती पोहोचेल. थांबेः दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम.

डब्यांची रचनाः एकूण २२ डबे = प्रथम वातानुकूलित ०१ इबा, मिश्रित (प्रथम वातानुकूलित द्वितीय वातानुकूलित) २१ डबा, द्वितीय वातानुकूलित ०३ डबे, तृतीय वातानुकूलित ११. डबे, स्लीपर ०२ डबे, सामान्य ०२ डबे, ति एसएलआर ०२ डबे. २) गाडी क्रमांक ०१४६३ / ज ०१४६४ लोकमान्य टिळक (टी) कोचुवेली लोकम कि ान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) कोचुवेली विशेषता (साप्ताहिक) लोकमान्य टिळक (टी) येथून १६:०० वाजता गुरुवारी १९/१२/२०२४, २६/१२/२०२४, ि ०२/०१/२०२५ आणि ०९/०१/२०२५ रोजी सुटेल आणि कोचुवेली येथे ती दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४६४ कोचुवेली लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) कोचुवेली येथून १६.२० वाजता शनिवारी २१/१२/२०२४, २८/१२/२०२४, ०४/०१/२०२५ आणि ११/०१/२०२५ रोजी सुटून लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल.

थांबेः ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकल, मकांबिका रोड बायंदूर (एच), कुंडापूर, उडुपी, सुरतकल, मंगळूर जंक्शन, कासरगोड, कन्नूर, कोळीकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन, त्रिशूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मवेलिकरा, कयांकुलम आणि कोल्लम जंक्शन.

डब्यांची रचनाः एकूण २२ एलएचबी डबे द्वितीय वातानुकूलित – ०२ डबे, तृतीय वातानुकूलित ०६ डबे, स्लीपर – ०९ डबे, सामान्य ०३ इबे, जनरेटर कार – ०१ डबा, एसएलआर ०१ डबा.३) गाडी क्रमांक ०१४०७/०१४०८ पुणे जंक्शन करमळी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक): गाडी क्रमांक ०१४०७ पुणे जंक्शन – करमळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून ०५:१० वाजता बुधवार २५/१२/२०२४, ०१/०१/२०२५ आणि ०८/०१/२०२५ रोजी सुटेल आणि गाडी करमळी येथे त्याच दिवशी २०:२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४०८ करमळी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक) करमळी येथून २२:०० वाजता बुधवार २५/१२/२०२४, ०१/०१/२०२५ आणि ०८/०१/२०२५ रोजी सुटेल. गाडी पुणे, जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी १३:०० वाजता पोहोचेल. थांबेः चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम.

डब्यांची रचनाः एकूण १७ डबे = प्रथम वातानुकूलित ०१ डबा, द्वितीय वातानुकूलित ०१ डबा, तृतीय वातानुकूलित – ०२ डबे, स्लीपर ०५ डबे, सामान्य ०६ डबे, एसएलआर – ०२ डबे.

RELATED ARTICLES

Most Popular