सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. एम्स रुग्णालयात गुरुवारी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अवघ्या देशावर शोककळा पसरली असून भारतीय अर्थव्यवस्थेला जगात म ोठे स्थान मिळवून देणारा अर्थशास्त्रातील ‘सिंह’ गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर बेळगावमध्ये गुरुवारपासून सुरू झालेले काँग्रेसचे अधिवेशन रद्द करण्यात आले असून साऱ्या नेत्यांनी तातडीने दिल्लीला धाव घेतली आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्ष होते.
एम्स रुग्णालयात दाखल – प्रकृती खालावल्याने. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंजाबचे सुपूत्र – डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. साम ान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली. डॉ. मनमोहन सिंग यांनी १९४८ मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी १९५७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६२ मैध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी. फिल पदवी मि ळवली. त्यांच्या शिक्षणाची आवडीने त्यांना त्यांना पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणलं.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर – १९७१ मध्ये मनमोहन सिंग भारत सरकारच्या सेवेमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. १९७२ मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.
अर्थमंत्री म्हणून छाप – मनमोहन सिंग १९९१ ते १९९६ पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवले, ज्याचे जगभरात कौतुक झाले. या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नवी दिशा दिली. डॉ. मनमोहन सिंग १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि २०१९ मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले. १९९८ ते २००४ पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी डॉ. त्यांनी १९९९ मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही.
दोन वेळा पंतप्रधान – २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, २२ मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं. २००९ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि २०१४ पर्यंत ते या पदावर राहिले.
अर्थमंत्री म्हणून सुरुवात – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असणाऱ्या मनमोहन सिंग यांनी १९९१च्या लोकसभा निवडणुकीनंतरं राजकारणात प्रवेश केला.. तत्कालिन पंतप्रधान डॉ. पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून घेतले. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण अवस्थेतून जात होती. जगातही मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था ढासळत असताना मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या स्पर्धेत तोडस तोड अशी उभी केली. अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले.
२००४ मध्ये पंतप्रधान – ९१ साली थेट अर्थमंत्री म्हणून भारतीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसने विशेषतः सोनिया गांधींनी २००४ साली पंतप्रधानपदाची धुरा सोपविली. २००४ पासून २०१४ पर्यंत १० वर्षे ते पंतप्रधान होते. फारसे न बोलणारे पंतप्रधान म्हणून ते ओळखले जात. तरीदेखील त्यांनी एक सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून कामगिरी केली. देशाच्या आर्थिक उन्नतीवर तर त्यांनी लक्ष केंद्रीत केले त्याच जोडीला सामाजिक सुधारणांना चालना देणाऱ्या अनेक योजना राबविल्या. माहितीचा अधिकार तसेच शिक्षण हक्क कायदा त्यांच्या काळात झाला. ‘शेतकऱ्यांना ऐतिहासिक अंशी कर्जमाफीदेखील मनमोहन सिंग यांच्याच काळात मिळाली. ३३ वर्ष मनमोहन सिंग खासदार होते. एक संवेदनशिल नेता म्हणून देश त्यांना ओळखतो. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टरेट – डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी श्री गुरुमुख सिंह यांच्या कुटुंबात झाला. १९४७ साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. मनमोहन सिंग यांनी १९५८ मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग या ३ मुली आहेत.