22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriकुवारबाव लसीकरण राजकीय दबावाखाली, सर्वसामान्यांचे हाल

कुवारबाव लसीकरण राजकीय दबावाखाली, सर्वसामान्यांचे हाल

रत्नागिरीमध्ये कोरोनाचे प्रमाण मागील वर्षापेक्षा आटोक्यात आले आहे. तरी सुद्धा जिल्हा प्रशासन लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करण्याकडे भर देत आहे. स्थानिक विभागातील लसीकरण ऑनलाइन सुद्धा काही क्षणात फुल्ल होते तर ऑन द स्पॉट लसिकरणामध्ये  सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे.

मिनी रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुवारबाव मध्ये लसीकरणाची मोहीम राबविण्यात येते, परंतु, शासकिय अहवालानुसार चांदेराई PHC अंतर्गत येणाऱ्या कुवारबावमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त ८% व चांदेराई गावामधे ४५% लसिकरण पूर्ण झाले आहे. कुवारबाव गावावर करण्यात आलेला हा मोठा अन्याय आहे. लसीकरणासाठी उपलब्ध झालेल्या डोसचे नियोजन आरोग्य विभागाने करण्याऐवजी ते राजकीय व्यक्तिकडुन केले जात आहे. मग तेथे सकाळी ५ वाजल्यापासुन टोकनसाठी रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तिना डावलून फक्त आपल्या ओळखीच्या व्यक्तिनाच लसीकरण केले जात आहे.

कारवांचीवाडी येथे ३० ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात आले, पण कुवारबाव गावातील इतर लोकाना रांगेत उभे राहुनही काही वेळाने लस संपली म्हणून माघारी धाडण्यात आले व स्वतःच्या खास मर्जीतील स्थानिक लोकाना लस देण्यात आली. या विरुद्ध भाजपा कुवारबाव कडुन सतेज नलावडे, दीपक आपटे आआणि नितिन आपकरे यांनी मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे व हे प्रकार त्वरित थांबवावे आणि न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुक़ा आरोग्य अधिकारी यांना कळवून देखील याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कुवारबाव वासियांवर होत असलेल्या अन्यायावर त्वरित योग्य ती कारवाई करावी.

RELATED ARTICLES

Most Popular