24.1 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeKhedजल मिशन योजनेतंर्गत नळपाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावाः ना. योगेश कदम

जल मिशन योजनेतंर्गत नळपाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावाः ना. योगेश कदम

या बैठकीस आमदार भास्कर जाधव अनुपस्थित राहिले.

तालुक्यात यंदा १७ गावे ४४ वाड्या पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोमवारी भरणे येथील श्री काळकाई मंदिर सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आराखडा आढावा बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत सर्वच अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या. या बैठकीस आमदार भास्कर जाधव अनुपस्थित राहिले. दोन तासातच पाणीटंचाई आढावा बैठक आटोपती घेण्यात आली. तालुक्याला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या गाव वाड्यांची माहिती देण्यात आली.

संभाव्य पाणी टंचाईबाबत विचारविनीमय करून पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री कदम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जल मिशन योजनेतंर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनांची कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्री कदम यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तालुक्यात मिशन बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबतही सूचना केल्या. या बैठकीत ग्रामस्थांनी उपस्थितीत केलेल्या शंकांचे त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात आले.

टंचाई आराखड्यात सुसेरी देवसडेतील कदमवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, सावंतवाडी, मधलीवाडी, दिवाणखवटी-सातपानेवाडी, फुरूस-गावठण, बौद्धवाडी, कातळवाडी, मोहल्ला, रेवाळेवाडी, पाटीलवाडी, सुतारबाडी, नवानगर, कांगणेवाडी, कुंभेवाडी, फळसोडा, कुळवंडी शिंदेवाडी, तळे-पालांडेवाडी, धनगरवाडी, तुळशी बुद्रुक कुबजई, धनगरवाडी, चिंचवली ढेबेवाडी, घेरारसाळगड पेठवाडी, तांबडवाडी, बौद्धवाडी, ओझरवाडी, निमणी धनगरवाडी यांचा समावेश आहे. याशिवाय खवटी-वरची धनगरवाडी खालची धनगरवाडी, अस्तान-चाटव धनगरवाडी, कशेडी-बोरटीक बंगला, थापेवाडी, सवणस-नाभिकवाडी, वरचीवाडी, खालचीवाडी, चिरणी-धनगरवाडी, खोपी-अवकिरेवाडी, मानेवाडी, कळंबणी बुद्रुक दंडवाडी, तिसंगी-धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी आदी गाव-वाड्याही पाणीटंचाई आराखड्यात समावेश आहेत. या बैठकीस प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनावणे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक विविध खात्यांचे अधिकारी, सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular