29.6 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeTechnologyव्हॉट्सअ‍ॅपची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई

व्हॉट्सअ‍ॅपची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या नियमावली अंतगर्त एकूण ३० लाखांपेक्षा जास्त अकाउंट्स दिड महिन्यात बॅन केले आहेत. ही अकाउंट्स बॅनची कारवाई १६ जून ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आली आहे. एकाच वेळी एवढी अकाउंट्स बॅन करण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी १५ मे ते १५ जून दरम्यान २० लाख भारतीय लोकांचे अकॉउंट नियमबाह्य असल्याने बॅन करण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपने जून ते जुलैच्या कालावधीत ३० लाखांपेक्षा जास्त भारतीय युजर्सचे अकॉउंट बॅन केल्याची माहिती कंपनीच्या कम्प्लयांस अहवालामधून मिळाली आहे. सदरची बंदी अपायकारक वागणुकीमुळे आणण्यात आल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमावली लागू करण्यात आली आहे त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस अहवाल प्रसिद्ध करावा लागतो,  त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आपला अहवाल सादर केला आहे.

भारतातील तक्रार अधिकारी  म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने परेश लाल  यांची नेमणूक केली आहे. जून व जुलै दरम्यान एकूण ५९४ तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्या मेसेज, मीडिया फाईल किंवा एखादी व्यक्ती त्रास देत असेल तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप तक्रार अधिकारीना कळवू शकता. यासाठी तुम्ही दोन पर्याय व्हॉट्सअ‍ॅपने उपलब्ध करून दिले आहे. एक म्हणजे grievance_officer_wa@support.whatsapp.com या ई-मेल आयडीवर मेल करू शकता किंवा अधिकृत टोल फ्री 1800-212-8552 या नंबरवर फोन करून तक्रार नोंदवू शकता. तसेच Post Box No. 56. Road No. 1, Banjara Hills. Hyderabad – 500 034. Telangana, India  या पत्त्यावर सुद्धा तुम्ही पत्राद्वारे लेखी तक्रार नोंदवू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular