27.3 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriराष्ट्रीय महामार्गावरील अपघातात घट….

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात घट….

महामार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झालेली आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख तीन राष्ट्रीय महामार्गासह राज्यमार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिस विभागाने ब्लॅकस्पॉटवर लक्ष केंद्रित करून तिथे सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या. मिऱ्या-नागपूर महामार्गावर एक तर मुंबई-गोवा महामार्गावर २३ ब्लॅकस्पॉट आहेत. तिथे चौपदरीकरणांतर्गत कामे सुरू असून, रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणांवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत अपघातांच्या संख्येत घट होत आहे. तसेच अपघातातील जखमींना तातडीने प्रथमोपचार मिळावेत यासाठी मृत्युंजयदूतसारखे उपक्रम राबवल्यामुळे प्राणहानी टाळणे शक्य झाले आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय राखत गेले काही महिने नियोजन केले. महामार्ग वाहतूक पोलिस रत्नागिरी विभागाकडे कशेडी, चिपळूण, हातखंबा अशी तीन पोलिस मदतकेंद्रे आहेत. त्यांच्याकडे मुंबई-गोवा महामार्गाचे पोलादपूर (जि. रायगड) ते मोरवंडे ७५ कि. मी., मोरवंडे ते बावनदी ९८ कि. मी., बावनदी ते खारेपाठण (जि. सिंधुदुर्ग) ९० कि. मी. अशी तर गुहागर-विजापूर महामार्गावरील चिपळूण ते मंडणगड ७५ कि. मी., चिपळूण ते कराड ५० कि. मी. आणि मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे मिऱ्यागाव ते आंबागाव (जि. कोल्हापूर) ७३ कि. मी. असे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग येतात.

खेड ते पोलादपूर ५० कि. मी., संगमेश्वर ते साखरपा ३० कि. मी., वहाळ ते आबलोली ६० कि. मी., ओणी ते पाचल ४० किमी असे राज्यमार्ग येतात. या मार्गावर गेल्या सहा वर्षांत अपघात कमी झाले आहेत. याबाबत रत्नागिरी विभागाच्या महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक दीपाली जाधव म्हणाल्या, ‘महामार्गावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झालेली आहे. काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो आणि अपघात होतात. त्यांना शिस्त लागावी यासाठी कारवाई सुरू आहे. ब्लॅकस्पॉटवर विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पाठपुरावा करून उपाययोजना केल्या आहेत. चौपदरीकरणातील अपूर्ण कामांच्या ठिकाणी पर्यायी वळण रस्ते काढून तिथे फलक, रिफ्लेक्शन बोर्ड लावलेले आहेत. त्याचप्रमाणे इंटरसेप्टरद्वारे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.’

RELATED ARTICLES

Most Popular