25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriकोकणातील पशुधन गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घटले?

कोकणातील पशुधन गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घटले?

शासनामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.

कोकणात दिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शेती, गुरचरण क्षेत्र कमी होत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्याचबरोबर पशुपालकांचा कल आता कमीत कमी पशुधनातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे बावत आहे. वा सर्वांचा परिणाम कोकणातील पशुधनावर होत आहे. त्यामुळे कोकणातील पशुधन गेल्या पाच वर्षांचा तुलनेत दहा ते पंधरा टक्याने कमी होण्याची शक्यता पशुधन विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. सध्या २१ वी पशुधन गणना सुरू आहे. त्यानंतर कोकणातील पशुधनाची निश्चित आकडेवारी स्पष्ट होणार आहे. कोकणांतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालपर या जिल्ह्यांमध्ये कधीकाळी विपुल प्रमाणात पशुधन होते. पण आता परिस्थिती बदलत आहे. कोकणातील गावातल्या प्रत्येक गोठ्यात किमान आठ दहा गुरांची असलेली संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची रोडावली आहे.

काही वर्षांपूर्वी काही हजारांच्या संख्येत-असलेले पशुधन आता काही शेकडयांवर आले आहे. शहरी राहणीमानाचे आकर्षण खेडयापाड्यापर्यंत पोचले आणि खेड्यांची दिशाच बदलून गेली. सहज उपलब्ध होणायां वस्तूंचे प्रमाण वाढल्याने माणसांची शेतात कष्ट करण्याची इच्छा कमी कमी होत गेली. गावातली तरुणाई शेतीपासून दूर गेली आणि मुंबई, पुण्यासारख्या शहरात जाऊन विसावली. दोन तीन महिन्यांच्या शेतीसाठी वर्षभर गुरेखारे संभाळणे पुढे गावात राहणायांना परवडेनासे झाले. मग गोठ्यातील एक दोन करता करता संपूर्ण गोधर नाहीसे झाले. कधीकाळी पशुधनाने संपत्र असलेले व गजबजलेला कोकण प्रांतात आता नागरीकरण झपाट्याने सुरु आहे. याचा सर्व परिणाम शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर होत आहे.

शासनामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. पहिली पशुगणना १९१९-२० मध्ये झाली होती. राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये नववी पशुगणना पेण्यात आली होती. गात देशी, विदेशी संकरित गाय, म्हैशी, रेडे, मेंडरे, शेळ्या, डुकरे, गावचे व इतर काही प्राण्यांची माहिती संकलीत करण्याचे काम करण्यात येते. याशिवाय कोंबड्या बदके आदी पक्ष्यांचीही गणना करण्यात येते. यामुळे शासनाला उपलब्ध पशुधनाची निखित माहिती होऊन त्याप्रमाणे योजना तयार करता येतात. सध्या २१ श्री पशुगणना सुरु आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्हयांमध्ये सुमारे ७० ते ८० टक्के पशुधन गणनेचे काम पूर्ण झाले आहे. या पशुधन गणनेची निश्चित आकडेवारी ३२ मार्चनंतर समोर येणार असली तरी मागील पाच वर्षात पशुधनापेक्षा दहा ते १५ टक्याने पशुधन कमी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular