26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeKhedखेड रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची गर्दी

खेड रेल्वेस्थानकात चाकरमान्यांची गर्दी

कोकण मार्गावरून धावणाऱ्या ५ रेल्वेगाड्या उशिराने मार्गस्थ झाल्या.

परतीला निघालेल्या चाकरमान्यांमुळे सर्वच रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावल्या. येथील स्थानकात परतीच्या चाकरमान्यांनी गर्दीचा उच्चांक केला. कोकण मार्गावरून धावणाऱ्या ५ रेल्वेगाड्या उशिराने मार्गस्थ झाल्या. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसला ४ तास उशिरा धावल्याने प्रवासी खोळंबले. अन्य चार रेल्वगाड्याही विलंबाने रवाना झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामदेवतांच्या दर्शनानंतर गावी आलेल्या चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. नियमित गाड्या प्रवाशांच्या विक्रमी गर्दीने धावत आहेत. शिमगोत्सवासाठी कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या होळी स्पेशल गाड्यांच्या फेऱ्याही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव होळी स्पेशलची अखेरची फेरी २० मार्च, तर एलटीटी मडगाव दुसऱ्या होळी विशेषची फेरी २४ मार्चला धावणार आहे. याचमुळे परतीला निघालेल्या चाकरमान्यांच्या गर्दीने येथील स्थानकात उच्चांक केला.

सकाळपासूनच मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांनी येथील रेल्वेस्थानकातील फलाट फुल्ल झाले होते. स्थानकात दाखल झालेल्या रेलवेगाड्यांमध्ये प्रवेश मिळवताना चाकरमान्यांची दमछाक झाली. त्यात विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची भर पडल्याने काही अंशी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसपाठोपाठ कोईमतूर-जबलपूर एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे तर सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने रवाना झाली. एलटीटी-महगाव एक्स्प्रेस २ तास ५० मिनिटे तर निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस एक तास विलंबाने मार्गस्थ झाली.

RELATED ARTICLES

Most Popular