25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriजिल्ह्यात पाच महिन्यांत १२ बेवारस मृतदेह

जिल्ह्यात पाच महिन्यांत १२ बेवारस मृतदेह

अनेक मृतदेह सडलेले किंवा अगदी सांगाडा सापडतो,

नदी, समुद्रकिनारी, खाजणात, जंगलात किवा अगदी निर्जनस्थळी बेवारस मृतदेह सापडतात; मात्र तपास करताना ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसयंत्रणेसमोर असते. अनेक मृतदेह सडलेले किंवा अगदी सांगाडा सापडतो; परंतु तो घातपात असल्याचा संशय असला तर पोलिसांना अशा घटनेतील धागेदोरे गोळा करून माग काढावा लागतो. टॅटू, गोंदण, खिशातील साहित्यामुळे ओळख पटते; परंतु अनेकवेळा ओळख पटवण्यात अपयश येते आणि त्या घटनेचा छडा लागत नाही. गेल्या ५ महिन्यांत जिल्ह्यात असे १२ बेवारस मृतदेह पोलिसदलाला सापडले आहेत. बेवारस मृतांमध्ये घातपाताची शक्यता अधिक असते. यामध्ये आर्थिक, सामाजिक कारणे असतात. प्रेमसंबंध, मालमत्तेवरून वाद, पैशांचा हव्यास, आर्थिक व्यवहार आदी कारणांवरून हत्या केली जाते; मात्र त्यामगची कारणे शोधताना मृतांची ओळख पटली नाही तर पोलिसयंत्रणेचा ओळख पटवण्यासाठी कस लागतो.

तपासात मृतांचे कपडे, पाकीट, दागिने आणि कपड्यावरील टेलरचा मार्क या गोष्टी पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाच्या ठरत असतात तसेच काहीवेळा मृतांच्या अंगावर कपडेही नसतात. ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडत नाही. अशावेळी त्या मृतांच्या शरीरावर टॅटू किंवा गोंदण असेल तर त्यावरून त्याची ओळख पटण्यात पोलिसांना मदत होते. यावरून तपासाला दिशा मिळते. जिल्हा पोलिस दलाने मृतदेहावरील टॅटू आणि गोंदण यावरून त्याची ओळख पटविण्याबरोबर घातपाताचेही प्रकार उघडकीस आणले आहेत. पण बरेचवेळा अनेक घटनांमध्ये मृतदेह बऱ्याच दिवसांचा कुजलेला चेहरा विद्रुप असा असल्याने ओळख पटवणे कठीण होते.

मृतदेहांची ओळख पटवणे सुरू – जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत जानेवारी-०, फेब्रुवारी-१, मार्च-४, एप्रिल-३ व मे मध्ये ४ मृतदेह आढळले आहेत. या बारा मृतदेहांची ओळख पटवून हा गुन्हा निकाली काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा प्रयत्न आहे.

अनैसर्गिक कारणामध्ये तपास खडतर – घातपाचे प्रकार वाढले आहेत. यामागची कारणे बहुतेकवेळा प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंध, व्यसनाधीनता, आर्थिक व्यवहार, कर्जबाजारीपणा, मालमत्ता किंवा अन्य कारणांवरून असलेले वाद, कौटुंबिक वाद आदी अनेक आर्थिक व सामाजिक कारणे असतात. मृताचा चेहरा विद्रुप केलेला असतो. काहीवेळा केवळ सापळाच असतो अशावेळी त्याच्या कवटीवरून शोध घेतला जातो.

RELATED ARTICLES

Most Popular