26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriमुंबई-रत्नागिरी जलवाहतुकीच्या हालचालींना वेग…

मुंबई-रत्नागिरी जलवाहतुकीच्या हालचालींना वेग…

या जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून जहाज सुटणार आहे.

मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी नुकतीच केली असून जलवाहतुकीचा चांगला पर्याय यानिमित्ताने निर्माण होणार आहे. या प्रकल्पाने चांगला वेग घेतला असून, ज्या एजन्सीचे जहाज निश्चित केले आहे त्या जहाजाच्या कॅप्टन व अन्य टीमने भगवती व जयगड बंदराची नुकतीच पाहणी केली. पावसामध्ये एवढ्या जलदगतीने त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, सुरक्षा, प्रवासीसुरक्षा, वाहन उतरवण्यासाठी स्थिर जेटी उपलब्ध होणे आव्हानात्मक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या रो-से सेवेला अडथळ्यांशी सामना करावा लागणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. प्रादेशिक बंदर विभागाच्या पाहणीमध्ये या अडचणी पुढे आल्या आहेत.

रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच मांडवा-माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. दळणवळण व्यवस्था भक्कम करतानाच रस्ते आणि रेल्वे सोबतच जलवाहतूक वाढावी यासाठी सरकार प्राधान्य देत आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो-रो जलसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतून थेट रत्नागिरीपर्यंत ३ तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत तब्बल साडेचार ते पावणेपाच तासात पोहोचता येणार आहे. या जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून जहाज सुटणार आहे.

यासाठी लागणारी मोठी बोट (क्रूझ) मुंबईत दाखल झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस त्याची पाहणी करतील आणि लवकरच गणेश चतुर्थीच्यापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न असेल, असे मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले. गणेशचतुर्थी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाने गती घेतली आहे. जे क्रूझ निश्चित करण्यात आले आहे त्या क्रूझच्या कॅप्टन व अन्य टीमने भगवती आणि जयगड बंदराची पाहणी केली. या बंदरामध्ये प्रवासी आणि वाहने उतरण्यासाठी योग्य जेटी आहे का? येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काय करता येईल? त्यांना उतरणे आणि चढवण्याच्यादृष्टीने काय व्यवस्था आहे, आदी बाबींचा विचार सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular