26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...

कामगारांना वेतन २५ हजार मिळतात फक्त ९ ते १० हजार – महानिर्मिती अधिकारी

पोफळी येथील महानिर्मिती विभागात १८० कामगार ठेकेदार...
HomeChiplunवणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम - मंत्री उदय सामंत

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

३० टक्के वणवे हे सिगारेट, माचिसच्या काड्या, विजेच्या स्पार्किंगमुळे लागतात.

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न पडता वणवा होऊच नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शासनाकडे वणवामुक्तीसाठी स्वतंत्र योजना नसली तरी जनजागृती मोहिमेची सुरुवात आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून करत आहोत. या अभियानाचा प्रारंभ मी आज चिपळूणमधून करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी व ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्यावतीने आयोजित वणवा प्रतिबंधक उपाययोजना कार्यशाळा व खैर रोपे वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे झाला. या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, वनमंत्री असताना आमदार भास्कर जाधव यांनी राज्यात वणवामुक्तीसाठीचे पहिले सादरीकरण दिले.

त्यातून समिती स्थापन झाली होती; पण भरपाईच्या स्वरूपावरच चर्चा अडकली. तरीही त्यांनी उचललेले पहिले पाऊल विसरता कामा नये. नंदुरबार येथील वनाधिकारी साळुंखे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, सुरक्षारक्षक नेमल्याने तिथे ७० टक्के वणवे कमी झाले. उर्वरित ३० टक्के वणवे हे सिगारेट, माचिसच्या काड्या, विजेच्या स्पार्किंगमुळे लागतात. अशा घटनांना आळा बसावा यासाठी जाणीवपूर्वक वणवा लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी केले. त्यांनी सांगितले, जिल्ह्यात चार टायगर आणि सहा ब्लॅक पँथर आढळून आले आहेत त्यामुळे जंगलसंवर्धन अधिक महत्त्वाचे ठरत आहे.

याशिवाय शासनाच्या निधीतून आंबा, काजू व खैर लागवडीसाठी साडेचार लाख रोपे उपलब्ध करून देण्यात आली असून, दरवर्षी ही मोहीम दहा-पंधरा वर्षे चालवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, विनोद झगडे, रामशेठ रेडीज, शहानवाज शहा, भाऊ काटदरे, विश्वास पाटील, समीर कोवळे, बापू काणे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular