25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeKhedग्राहक बनून आलेल्या ४ महिलांनी ज्वेलर्समधून मंगळसूत्र लांबविले

ग्राहक बनून आलेल्या ४ महिलांनी ज्वेलर्समधून मंगळसूत्र लांबविले

महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मंगळसूत्र खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये आलेल्या ४ महिलांनी हातचलाखी दाखवत सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे. शहरातील ऋषभ ज्वेलर्समध्ये झालेल्या या चोरीने खेड बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. त्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. बुधवारी दिवसाढवळ्या खेडसारख्या छोट्या शहरातील एका ज्वेलर्समध्ये अशा पध्दतीने चोरी झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकही हादरले आहेत. अधिक वृत्त असे की, बुधवारी दुपारी ४ महिला ऋषभ ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी आपल्याला मंगळसूत्र खरेदी करायचे आहे, असे सांगितले. विक्रेत्याने त्यांना मंगळसूत्र दाखविले. त्यातील एका महिलेने अडीच ते तीन ग्रॅम वजनाचे एक मंगळसूत्र निवडले आणि त्याची हातात घेऊन तिने पाहणी केली आणि पाहता पाहता हातचलाखी करत तिने ते लांबविले. तिच्यासह अन्य तिन्ही महिला अवघ्या १० मिनीटांच्या आत दुकानातून बाहेर पडल्या. त्या पैसे न देताच निघून गेल्याचे कळताच दुकानातील कर्मचारी आणि अन्य मंडळी गोंधळली. त्यांनी पोलीसांशी संपर्क साधला.

दरम्यान पोलीसांनी दुकानात येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या महिला त्यामध्ये दिसत आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. खेड-दापोली परिसरात याआधीही महिलांकडून अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच खेड रेल्वे स्थानक परिसरात, रिक्षात बसण्याच्या गडबडीत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आली होती. या सलग घटनांमुळे चोरी करणाऱ्या महिलांची टोळीच या चोरीम ागे सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय अधिकच बळकट झाला आहे. खेड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सोन्याचे व्यापारी व मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सतर्क राहाण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांच्या वेशात येणाऱ्या अशा टोळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची ही सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular