25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriलांज्यातील तरुणाची कर्तबगारी! मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत, पोलिस विलक्षण थक्क

लांज्यातील तरुणाची कर्तबगारी! मुंबईपासून ते सोलापूरपर्यंत, पोलिस विलक्षण थक्क

सुमारे ६० तरुण-तरुणींना त्याने लाखो रुपयाला फसविल्याचे समोर आले आहे.

जीवनसाथी अॅपवर पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून तरुणाने अनेक तरुणींना फसवणाऱ्याच्या नाड्या आवळण्यात आल्या आहेत. सोलापूर शहर सायबर पोलिसांनी वैभव दिपक नारकर (वय ३१) या संशयितास मुंबईतून पकडून आणले आहे. त्याने सोलापूर शहरातील एका तर मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमधील सुमारे ६० तरुण-तरुणींना त्याने लाखो रुपयाला फसविल्याचे समोर आले आहे. तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गोविळ गावचा असल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी आवडीचा पती किंवा पत्नी मिळावी म्हणून जीवनसाथी अॅपवर अनेकजण नोंद करतात. त्यावर आपण पोलिस उपनिरीक्षक असल्याचे प्रोफाईल त्याने तयार केले होते.

त्या अॅपवर त्याने पोलिसांच्या खाकी गणवेशातील फोटो देखील टाकले होते. मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोविळ (ता. लांजा) असलेला वैभव सध्या मुंबई, नायगाव येथे रहायला आहे. त्याने सोलापूर शहरातील एका तरुणीशी ओळख करून तिच्याशी बोलणे सुरू केले. काही दिवस गेल्यावर त्याने १९ जुलै ते ८ ऑगस्ट या काळांत त्या मुलीकडून मावस भाऊ व मावशीचा अपघात झाला म्हणून आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून ६३ हजार रुपये हडपले. त्या मुलीच्या तक्रारीनंतर सोलापूर शहर सायबर पोलिस त्याचा शोध घेत होते..

पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलिस अंमलदार कृष्णात जाधव, निलेश गंगावणे, नितीन आसवरे, मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने संशयिताला मुंबईतून अटक केली. तोतया पोलिस उपनिरीक्षक वैभव नारकर याने जीवनसाथी पवरून सात-आठ मुलींना विवाह करतो म्हणून नादी लावले होते. त्यांच्याकडूनही त्याने पैसे उकळले. याशिवाय त्याने ४० ते ५० मुलांशी संपर्क करून नोकरीचे आमिष दाखविले होते. मंत्रालय, पोलिस दलात मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून त्याने त्यांना नोकरीचे आमिष दिले होते. त्यांच्याकडूनही संशयिताने लाखो रुपयाला गंडा घातल्याची बाब तपासात समोर आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular