24 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली...

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeChiplunचिपळूणच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा नगराध्यक्ष

चिपळूणच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा नगराध्यक्ष

आम. भास्कर जाधव यांच्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची लाज राखली गेली.

शहरातील मतदारांनी राजकीय कुस बदलल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला आहे. तर भारतीय जनता पार्टीने देखील आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक जागा जिंकून चिपळूणमध्ये आलेख चढता असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर आम. भास्कर जाधव यांच्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची लाज राखली गेली. एकूणच मतदारांनी आपला बदलेला मूड दाखवून दिला आहे. चिपळूणचे जाणता राजा म्हणून लौकिक असलेले तसेच चिपळूण शहरावर जबरदस्त राजकीय वर्चस्व राखलेले माजी आमदार रमेश कदम यांचा झालेला पराभव हे यावेळच्या निवडणुकीचा सर्वात मोठा गाभा ठरला. प्रत्यक्षात या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मोठा करिष्मा दिसून आला तर बरोबरीने भाजपने देखील चमत्कार घडवला.

चिपळूण नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले पहिला नगराध्यक्ष उम `श सकपाळ यांच्यां रूपाने विराजमान झाला. चिपळूणच्या जनतेने प्रथमच धनुष्यबाण चिन्हाला कौल दिला. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेत आता प्रथमच शिवसेनेचा नगराध्यक्ष दिसणार आहे.. चिपळूण शहरात यापूर्वी भाजपचे कधी एक-दोन तर कधी चार नगरसेवक निवडून येत होते. पाचच्या पुढे भाजपला यश मिळाले नव्हते. मात्र यावेळी भाजपने चिपळूण शहरात चमत्कार घडवला. फक्त ११ जागा लढवून भाजपने ७ जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपचा स्ट्राईकरेट तब्बल ७० टक्के राहिला. अन्य सर्व पक्षापेक्षा भाजपची सरासरी सर्वात जास्त ठरली. तर आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजेच ७ नगरसेवक निवडून आणत भाजपने चिपळूण शहरात आपला आलेख चढता असल्याचे दाखवून दिले आहे.

प्रत्यक्षात भाजपच्या या यशाचे शिल्पकार साहजिकच प्रशांत यादव तसेच त्यांच्या पत्नी सौ. स्वप्ना यादव हे दाम्पत्य ठरले. अंतिशय अभ्यासूपणे म ोजून घेतलेल्या जागा, , काटेकोर व सूक्ष्म नियोजन, गाजावाजा न करता राबवलेली शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांसह स्वतः घेतलेली मेहनत आणि विशेषतः निवडणूक प्रचारात पोकळ आश्वासने तसेच वायफळ भाषणबाजीवर ठेवलेले नियंत्रण, सोशल मिडियाचा खुबीने वापर, उमेदवारांच्या कागदोपत्री कामासाठी वेगळी टीम नियुक्त करून त्यांना उमेदवारांना प्रचारासाठी दिलेली मोकळीक आणि फक्त पक्षासाठी मते न मागता भाजप सेना युतीसाठी, चिपळूण शहराच्या विकासासाठी स्पष्ठ व्हिजन समोर ठेवून मतदारांना केलेले आवाहनं जनतेला भावले,

विशेष म्हणजे शिवसेना भाजप युतीच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान झाले. नगरसेवकांना मतदान पडले तितकेच मतदान किंबहुना त्यापेक्षा जास्त मते नगराध्यक्ष पदासाठी देखील झाले. परंतु दोन्ही राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे प्रचंड नुकसान झाल्याचे यावेळी दिसून आले. दोन्ही राष्ट्रवादी मि ळून फक्त ४ नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर शिंदे यांना मिळालेली मते काँग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे मात्र उबाठाची किम ान लाज राखली गेली. ५ नगरसेवक उबठाचे विजयी झाले. २ जागा अल्प मतांनी पराभूत झाले. तसेच उबाठा आणि राष्ट्रवादी यांची मते महाविकास आघाडीकडे न जाता ती थेट सेना भाजपकडे गेली. असेच या निकालाचे अवलोकन करावे असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular