28.8 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeMaharashtraएसटी कर्मचारी राज ठाकरेसमवेत शरद पवारांच्या भेटीला

एसटी कर्मचारी राज ठाकरेसमवेत शरद पवारांच्या भेटीला

एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, मागण्या मान्य करण्यासाठी सुरु असलेल्या संपाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंब दर्शविला आहे. राज ठाकरे यांच्या समोर एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी आपली व्यथा मांडली. फक्त त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे कि, कोणत्याही कर्मचार्याने आत्महत्येसारखे पाउल उचलू नये, आत्महत्या करण्यास माझे समर्थन नाही. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सर्व ओढवलेल्या परिस्थितीवर जवळपास तासभर चर्चा चालली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे.

उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला १२ आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समिती गठीत केली असल्याची  माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावरकर म्हणाले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या १० मिनिटे चर्चा मसलत झाली. अनिल परब यांनी नंतर सांगितले कि, विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल,  असे आश्वासन महामंडळाने दिले असून त्यासाठी पोलिसांशी चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular