23 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024
HomeLifestyle७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिवस

७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिवस

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनची स्थापना ७ एप्रिल 1947 रोजी झाली. ज्यावेळी 1950 साली या संघटनेची पहिली सभा घेण्यात आली तेंव्हा पहिला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला.

७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस आहे. जगभरातील लोकांना आरोग्याप्रति जागरूक राहण्यासाठी आणि निरोगी आरोग्यच सर्व काही आहे, याची जाणीव करून देण्यासाठी विशेषत: हा दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनची स्थापना ७ एप्रिल 1947 रोजी झाली. ज्यावेळी 1950 साली या संघटनेची पहिली सभा घेण्यात आली तेंव्हा पहिला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. तेंव्हा पासून दरवर्षी 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतो.

आजरी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा कधीही आधीच खबरदारी घेणे उत्तम आहे. आरोग्याची आधीपासूनच काळजी घेणं योग्य ठरत. आपल्या सर्वच ज्ञात आहोत, कि संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडत आहे. कोरोना व्हायरसला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, कोरोना व्हायरसवर सर्वत्र लसीकरण सुरु आहे, परंतु केसेस अजूनही दिवसेंदिवस वाढतच आहेत. या व्हायरसमुळे जगभरात शेकडो लोकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. या घातक व्हायरसपासून वाचण्यासाठी आपण स्वतःचं काळजीपूर्वक उपाय नक्कीच करू शकतो. गरज आहे ती थोडसं मनावर नियंत्रण मिळविण्याची आणि शासनाने सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन केल तर आपण नक्कीच कोरोनाला नक्कीच लढा देऊ शकतो. एवढचं नाहीतर काही गोष्टिंकडे नीट लक्ष दिले तर इतरही आजारांपासून दूर राहणे शक्य होऊ शकते. त्यासाठी गरज आहे दैनंदिन कामामध्ये थोडे बदल करण्याचे. ज्यामध्ये शारिरीक, मानसिक आणि पर्यावरण स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.

World Health Day 7 april

शरीर ताजेतवाने राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करा. उत्तम आरोग्यासाठी वेळेवर पौष्टिक आहाराचं सेवन करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. रोजच्या जेवणामध्ये सुद्धा जास्त तिखट अथवा मीठ असणारे आणि जास्त गोड पदार्थ कमी प्रमाणात खाणे कायम योग्य. सध्या सरकारने वर्क फ्रॉम होमचा कायदा केल्याने सर्व हालचाली कमी झाल्या असल्याने गरजेपेक्षा अतिरिक्त खाणं टाळा, एकवेळ दोन घास कमी खा. तसेच जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. निरोगी आयुष्यासाठी दररोज न चुकता व्यायाम करा. निगेटिव आचार आणि विचारांपासून दूर राहून शांत झोप घ्या.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात घर, ऑफिस आणि कामाचा ताण, यामुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष पुरेपूर दिले जात नाही. अशातच स्वताच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधीपासूनच तयारी बाळगा. एखादा आजार किंवा दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी एखादा मेडिक्लेम अथवा हेल्थ इन्श्यूरन्स काढून ठेवा.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने पछाडले असताना सुद्धा सर्व जग आज जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहे. हे दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फिर मुस्कुराएगा इंडिया, फिर जीत जाएगा इंडिया असे म्हणत एक व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या बरोबरच त्यांनी फ्रंट वर्कर्स असलेले कोरोनाशी गेले वर्षभर आपल्या जीवाची परवा न करता लढणारे डॉक्टर्स, नर्से आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांचेही विशेष आभार मानले आहेत. शिवाय प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शरीराच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा आवर्जून सल्ला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular