20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeEntertainmentसत्यशोधक

सत्यशोधक

महात्मा फुले आणि त्यांचे संपूर्ण कार्य चित्रपटाच्या माध्यमातून साकारणे म्हणजे सर्वांसमोर एक प्रकारचे आव्हानचं होते. सत्यशोधक' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम केले. आपल्या प्रखर लेखणीच्या व स्वकर्तृत्वाच्या माध्यमातून जन-माणसामध्ये नवीन विचार पेरणाऱ्या ज्योतीरावानी शोषणकर्त्यांना सुरुवातीपासूनच विरोध केला होता. बुरसटलेल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या गर्ततेत अडकलेल्या मानवी समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवून ज्योतीराव खऱ्या अर्थाने सत्य धर्माचे दिशादर्शक ठरले. या अशाच जुन्या प्रथांच्या विरोधात सत्याचा शोध घेताना आणि समानतेच्या वाटेवर चालताना सत्यशोधक  समाजाची त्यांनी निर्मिती केली. आता यावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

क्रांतिकारी महात्मा ज्योतीरावांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटामध्ये ज्योतीरावांच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी, तर सावित्री बाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे दिसणार आहेत. चित्रपटाचे 80 टक्के चित्रीकरण पूर्ण झालेले असून, येत्या मे महिन्यामध्ये उर्वरीत भागाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शीत केला जाणार आहे. १९ व्या शतकाची सुरुवात आणि तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी मोठे भव्य सेट उभारण्यात आले असून,  वी.एफ.एक्सच्या आधुनिक तंत्राचा देखील वापर करण्यात आला आहे.”आपल्या कार्य कर्तृत्वाने ‘महात्मा’ पदावर पोहोचलेले ज्योतीराव आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांची साथ देणाऱ्या सावित्री बाईंचा संपूर्ण जीवन प्रवास थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणादायी आहे.

महात्मा फुले आणि त्यांचे संपूर्ण कार्य चित्रपटाच्या माध्यमातून साकारणे म्हणजे सर्वांसमोर एक प्रकारचे आव्हानचं होते. सत्यशोधक’ चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. जोतिरावांच्या जीवनावर चित्रपट तयार करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे असं समता फिल्म्सचे निर्माते प्रविण तायडे, अप्पा बोराटे यांनी सांगितलं. ही कथा हिंदी-मराठी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असं मत पी बी इन्फ्राचे निर्माते पवन कुमार खोक्कर, भीमराव पट्टेबहादूर यांनी व्यक्त केले आहे. प्रेक्षकांच्या ह्या चित्रपटातून अपेक्षा नक्की पूर्ण होतील अशी खात्री या चित्रपटाचे सहनिर्माते बिंदर सिंग, विशाल वाहुरवाघ, प्रतीका बनसोडे यांनी दिली. चित्रपटातील प्रसंग बघताना प्रेक्षक त्यामध्ये गुंतून जातील. असे मत चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular