29.1 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriयेत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन परीक्षा या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने नागरिकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, राज्यातील एकूण कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढत चालली होती. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लावण्याची वेळ आली. मात्र कडक निर्बंध लावल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परीस्थिती दिलासाजनक आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्यामुळे, राज्य सरकारने २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा विचार लक्षात घेता, शाळा सुरु करण्याच्या या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि राज्यातील परिस्थिती पाहून बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलीये. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची तिसरी लाट या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास परत बंद झाले. आत्ताच्या स्थितीत कोरोनाची तिसरी लाट फार संहारक नाही असे चित्र दिसते आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील युवा पिढीचे लसीकरणही सुरु आहे अशा स्थितीत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस परत लवकर सुरू करणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन परीक्षा या सर्वांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याचा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे.

कोव्हीड संदर्भाने योग्य ती काळजी घेत, गुणात्मक शिक्षण परत एकदा तात्काळ सुरू करावे. रत्नागिरीमधील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये,  कोचिंग क्लासेस तात्काळ सुरू करण्यासंदर्भात निर्णय करावा अशी मागणी भा.ज.पा. रत्नागिरीकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular