27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...

कोत्रेवाडी कचरा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा…

कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग...
HomeMaharashtraराज ठाकरेंच्या आरोपांवर, शरद पवारांची तुफानी फटकेबाजी

राज ठाकरेंच्या आरोपांवर, शरद पवारांची तुफानी फटकेबाजी

राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत होतात आणि मग मध्येच येऊन एखादं लेक्चर झाडून जातात.

राज्यात गुढीपाडवा आणि नववर्ष उत्साहाने साजरे केले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा घेतली. महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधावरील बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरें हे सार्वजनिक सभेत बोलत होते.

राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सभेत ते म्हणाले कि, जेव्हा माणूस स्वाभिमान गहाण टाकतो, तेव्हा उरतात ती फक्त प्रेतं, असं म्हणत जनतेला स्वाभिमान जागा ठेवत यांना यांची जागा दाखवा,” असं राज ठाकरे म्हणाले. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, मग भोगा”; अशी खोचक टीका  राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली आहे.

१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही सर्वांसाठी अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा आणि धर्माचा द्वेष करायला शिकवलं. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला निव्वळ शरद पवार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्या केलेल्या टिकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काल राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणामध्ये विविध मुद्यांवरुन महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलंय की, राज ठाकरेंना राष्ट्रवादीचा इतिहास नीट तपासायाची गरज आहे. आमची भूमिका हि कायम सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आहे, असं त्यांनी म्हटलं.

तसेच त्यावेळी शरद पवार यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. राज ठाकरे यांची भूमिका बदललेली दिसत आहे का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की,  ते मोदींच्या संदर्भात काय काय भूमिका मांडत होते, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिल आहे, त्यामुळे आता त्यांची बदललेली भूमिका देखील महाराष्ट्र पाहत आहे. त्यांच्या कोणत्याच भूमिकेत सातत्य नसतं हे आपण वारंवार पाहिलं आहे.

राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत होतात आणि मग मध्येच येऊन एखादं लेक्चर झाडून जातात. पुढे ते म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा पक्ष प्रभाव किती आहे,  हे सर्व ज्ञात आहे. त्यांचा आकडा हाताच्या बोटांच्या मोजण्या पलिकडे जात नाही. यापलिकेडे ते काय कर्तृत्व गाजवतील, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला.

RELATED ARTICLES

Most Popular