29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...
HomeRatnagiriआंबा घाटात ट्रकचा अपघात, चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने बचावला

आंबा घाटात ट्रकचा अपघात, चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने बचावला

दहा लाख रुपयांची साखरेची पोती कोल्हापूरहून जयगडकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आंबा घाटातील कळकदरा येथे अपघात झाला.

घाटमाथ्यावरून प्रवास करताना अनेकदा चालकाचे नियंत्रण सुटल्याने अथवा रस्त्याचा अंदाज चुकल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. घाटातील रस्त्यातून देखील वेगाने अनेक जण अवजड वाहने हाकत असल्याने देखील अपघाताच्या घटना घडतात.

दहा लाख रुपयांची साखरेची पोती कोल्हापूरहून जयगडकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आंबा घाटातील कळकदरा येथे अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक १०० फुट खोल दरीत जाऊन कोसळला. हा अपघात सोमवारी मध्यरात्री रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो बचावला आहे.

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धीरज जगन्नाथ गाडेकर वय-३३, रा. करवीर, जि. कोल्हापूर असे या भीषण अपघातात जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. धीरज आपल्या ताब्यातील MH09/CA-1491 या ट्रकमध्ये साखरेची पोती भरून हा ट्रक कोल्हापूरहून जयगडकडे घेऊन जात होता. ट्रक कळकदरा येथे आला असता त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीमध्ये कोसळला.

यावेळी धीरज याने आपला जीव वाचवण्यासाठी ट्रक बाहेर ताबडतोब उडी मारली. आणि एका झाडाच्या सहाय्याने तो लटकत राहिला. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी होमगार्ड मंगेश शिंदे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रथम दरीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी कसोसीने प्रयत्न सुरू करण्यात आले. इतर वाहनचालकांना मदतीला घेऊन दोरीच्या सहाय्याने जखमी धीरजला दरीबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. उंचावरून पडल्याने चालक धीरज गंभीर जखमी झाल असून, त्याला अधिकच्या उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular